Breaking News

Tag Archives: कुणबी-मराठा आरक्षण

न्यायालयामुळे नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेल्या उमेदवारांनी मानले मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार

‘ साहेब, तुम्ही आशेचा किरण होता आणि तुम्ही हा विश्वास सार्थ ठरवला. साहेब हा विजय केवळ तुमच्यामुळेच आणि तुमच्या प्रयत्नांमुळेच झाला आहे. यामुळे आमच्या कुटुंबामध्ये आनंद, समाधान परतले आहे,’ अशा शब्दांमध्ये एमपीएससी व अन्य भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मुख्यमंत्री शिंदे यांनीही या भावनांचा स्वीकार …

Read More »

मनोज जरांगे पाटील जालन्यात येताच म्हणाले, २४ तारखेच्या लढ्यासाठी तयार रहा

मराठा-कुणबी समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देणार असल्याच्या मुद्यावरून ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली. तसेच राज्य सरकारवर आणि मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरही टीका करण्यास सुरुवात केली. तसेच राज्यभरात ओबीसी समाजाच्या संघटनेकडूनही राज्य सरकारच्या भूमिकेवर टीका करण्यात येत आहे. त्यातच आज दिवाळीच्या दिवशी मनोज जरांगे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, मराठा आरक्षण प्रगतीचा अहवाल आठवड्याला सादर करा

मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड …

Read More »

मराठवाडयातील इनाम जमिनीसंदर्भातील अहवाल तात्काळ शासनास सादर करा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे विभागीय आयुक्तांना निर्देश

राज्यातील व विशेषत; मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबीसमाजाचे दाखले देवून त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करण्याचा तत्वत; निर्णय राज्य सरकारने घेतला असतानाच आता मराठवाडा विभागातील इनाम जमिनीसंदर्भात देखील निर्णय घेण्यात येणार आहे , संदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल संबंधित जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांना तातडीने सादर करावा. विभागीय आयुक्तांनी मराठवाडा विभागाचा परिपूर्ण अभ्यास करुन वस्तुनिष्ठ …

Read More »