Breaking News

टायगर ३ च्या रीलीजपूर्वी विकीने केले कतरिनाच तोंडभरून कौतुक

सलमान खान आणि कतरीना कैफ यांचा ‘टायगर ३’ हा चित्रपट तब्बल सहा वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. दिवाळीच्या मुहुर्तावर १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान खान याच्यासोबत कतरिना कैफ धमाल करताना दिसले. अभिनेता विकी कौशलने बायको कतरिनाचे कौतुक केले आहे.

विकी कौशल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्याने लिहलं, ‘२०२३ चं दिवाळी गिफ्ट!!! #Tiger३ एक मस्त सिनेमा आहे. टायगर, झोया, आतिश सर्वांचे खूप खूप अभिनंदन’. ‘टायगर 3’ ला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत असल्याचे दिसत आहे. चित्रपटात कतरिना आणि सलमान जबरदस्त अ‍ॅक्शन करताना पाहायाल मिळत आहेत तसेच या चित्रपटाची प्रेषक वर्ग आतुरतेने वाट पाहत आहे.

तसेच टायगर ३ या चित्रपटातील शाहरुखच्या कॅमिओचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख हा सलमान खानला दुश्मनांपासून वाचवत असल्याचं दिसत आहे. सलमान खान हा दुश्मनांसोबत फाईटिंग करताना शाहरुख हा एक बॉम्ब तिथे टाकतो.

यावेळी झुमे जो पठाण हे गाणं ऐकू येत आहे. त्यानंतर शाहरुख खानची एन्ट्री होते. टायगर-३ या चित्रपटात शाहरुखनं चॉपरमधून एन्ट्री केली आहे. टायगर-३ या चित्रपटातील शाहरुखच्या कॅमिओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

Check Also

अंकिताचा बिगबॉस च्या घरात पतीवर आरोप; तू माझा वापर केलास”

‘बिग बॉस १७’ हिंदी च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांमधील वाद वाढत चालले आहेत. मराठमोळ्या अंकिता लोखंडेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *