Breaking News

मेथीची भाजी हिवाळ्यात जास्त खात असाल तर सावधान..

हिवाळ्याचे दिवस सुरू झाले असून थंडीच्या या दिवसांमध्ये बाजारात हिरवीगार मेथीची भाजी पाहायला मिळते. त्यात बहुतेक लोकांना मेथीची भाजी खायला भरपूर आवडते. मग थंडीच्या दिवसांमध्ये बहुतेक लोक मेथीपासून वेगवेगळे पदार्थ बनवतात. मग मेथीचे पराठे असो, मेथीची भाजी असो असे अनेक पदार्थ बनवत असतात. त्यात मेथी ही आपल्या शरीरासाठी गुणकारी असते.

मेथीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमीन, प्रोटीन असे अनेक गुणधर्म असतात. त्यामुळे मेथी ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. मेथी खाल्ल्यामुळे अनेक शारीरिक समस्या नाहीशा होतात. पण तुम्हाला माहितीये का की, मेथी ही जास्त खाणं आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. तर खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा

अॅलर्जीची समस्या

बहुतेक लोकांना मेथीची अॅलर्जी असते. जर अशा लोकांनी मेथी जास्त प्रमाणात खाल्ली तर त्यांच्या त्वचेवर अॅलर्जी निर्माण होण्याची शक्यता असते. मग मेथीमुळे झालेल्या अॅलर्जीने आपल्या चेहऱ्यावर सूज निर्माण होते. तसंच बहुतेक लोकांचे शरीर देखील दुखायला लागते. त्यामुळे मेथी जास्त प्रमाणात खाऊ नये.

पचनक्रिया बिघडते

मेथीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे मेथी खाल्ल्यानंतर पचनाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. पण जर जास्त प्रमाणात मेथी खाल्ली तर तुमचे पोट बिघडू शकते, गॅसची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे जास्त प्रमाणात मेथी खाऊ नका. तसंच ज्यांची पाचनशक्ती कमजोर आहे अशा लोकांनी जास्त प्रमाणत मेथी खाऊ नये.

उच्च रक्तदाब

मेथीमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मेथी जास्त खाल्ली तर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते. तसंच ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी जास्त प्रमाणात मेथी खाऊ नये. नाहीतर त्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.

शुगर लो होते

मेथी खाल्ल्यामुळे शुगर कमी होण्यास मदत होते. तसंच ज्यांना लो शुगरचा त्रास आहे अशांनी मेथीचे सेवन करू नये. कारण अशा लोकांनी जर मेथी जास्त प्रमाणात खाल्ली तर त्यांची शुगर आणखी लो होऊन त्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे लो शुगर असलेल्या लोकांनी जास्त प्रमाणात मेथी खाऊ नये.

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *