Breaking News

नाना पाटेकर यांचा मुलगा टॅलेंटमध्ये वडिलांपेक्षा चार पाऊल पुढे

अभिनेते नाना पाटेकर यांनी हिंदी, मराठी सिनेविश्वात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं. आजही नाना पाटेकर यांनी इंडस्ट्रीमध्ये कोणी घेऊ शकलं नाही. आजही चाहते नाना पाटेकर यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. नाना पाटेकर यांना अनेकवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

नाना पाटेकर यांच्या नावावर पद्मश्री पुरस्कारही आहे. नाना पाटेकर यांचं अभिनय, त्यांचे डायलॉग बोलण्याची शैली इत्यादी गोष्टींमुळे नाना पाटेकर चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. म्हणून प्रत्येक वयोगटातील व्यक्ती नाना पाटेकर यांचा चाहता आहे.नाना पाटेकर फक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नाही तर, प्रोफेशनल आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतात.

नाना पाटेकर यांचं लग्न अभिनेत्री आणि बँक अधिकारी नीलकांती पाटेकर यांच्यासोबत झालं. दोघांना एक मुलगा देखील आहे. नाना पाटेकर यांच्या मुलाचं नाव मल्हार पाटेकर असं आहे.नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर लाईमलाईटपासून दूर अत्यंत साधं आयुष्य जगतो. मल्हार याने मुंबईच्या सरस्वती मंदिर हायस्कूलमधून शिक्षण घेतलं मल्हार याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली आहे. मल्हारला लहानपणापासूनच सिनेमांमध्ये काम करण्याची आवड होत. पण मल्हार याचं स्वप्न पूर्ण होता होता राहिलं..

मल्हार दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सिनेमाच्या माध्यमातून सिनेविश्वात पदार्पण करणार होता. पण नाना पाटेकर आणि प्रकाश झा यांच्यात वाद झाल्यानंतर नाना यांनी मल्हार याला सिनेमात काम करण्यास नकार दिला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नाना पाटेकर आणि त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांची चर्चा रंगली आहे. प्रकाश झा यांच्या सिनेमात वडिलांनी काम करण्यास नकार दिल्यानंतर मल्हार याने राम गोपाल वर्मा यांच्या ‘द अटॅक ऑफ 26\11’ सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

‘आदिपुरुष’ ही माझी मोठी चूक, या दिग्दर्शकाने मान्य केली चूक या दिग्दर्शकाने अखेर मान्य केली चूक

आदिपुरुष या सिनेमावर जोरदार टीका झाली. या सिनेमातील डायलॉगवर प्रचंड वादविवाद झाले. या सर्व प्रकरणानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *