Breaking News

विशाखा सुभेदार ने मानले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार

संपूर्ण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीही जल्लोषात दिवाळी साजरी करतात. ठिकठिकाणी दिवाळीनिमित्त मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. आपल्या मित्रपरिवाराला आणि कुटुंबीयांना दिवाळीच्या खास भेटवस्तूही दिल्या जातात. कलाकार आणि राजकीय मंडळीही दिवाळीनिमित्त मित्रमैत्रिणींना भेटवस्तू देत नात्यातील गोडवा जपण्याचा प्रयत्न करतात.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे दरवर्षी जवळच्या व्यक्तींना खास गिफ्ट पाठवत दिवाळीच्या शुभेच्छा देतात.यंदा त्यांनी लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदारलाही खास भेटवस्तू पाठवली आहे.राज ठाकरेंकडून विशाखाला दिवाळीचा फराळ, चांदीचा दिवा, मेणाचे दिवे असं खास गिफ्ट देण्यात आलं आहे. विशाखाने सोशल मीडियावर याचा फोटो शेअर केला आहे.

राज ठाकरेंकडून मिळालेली दिवाळीची भेट पाहून विशाखा भारावून गेली आहे. हा फोटो शेअर करत तिने खास पोस्टही लिहिली आहे. “साहेब मनापासून धन्यवाद..! तुमची गोष्टच भारी. इतकं लक्षात ठेवून डायरेक्ट घरी फराळ पाठवला. त्याबद्दल एक मनसे कार्यकर्ती म्हणून खूप आनंद झाला,” असं विशाखाने पोस्टमध्ये लिहिलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

‘आदिपुरुष’ ही माझी मोठी चूक, या दिग्दर्शकाने मान्य केली चूक या दिग्दर्शकाने अखेर मान्य केली चूक

आदिपुरुष या सिनेमावर जोरदार टीका झाली. या सिनेमातील डायलॉगवर प्रचंड वादविवाद झाले. या सर्व प्रकरणानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *