Breaking News

उद्धव ठाकरे म्हणाले…पेन्शन योजना लागू केल्यानंतर हार-तुरे स्विकारणार

काही महिन्यांपूर्वी विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठीच्या निवडणूकीत जूनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र त्याच आता वर्षाहून अधिक काळ लोटला तरी जूनी पेन्शन संदर्भात अद्याप कोणताही निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला नाही. या प्रश्नी सरकारी कर्मचाऱ्यांनी सध्या नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला. या मोर्चाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संवाद साधताना म्हणाले की, जर मी मुख्यमंत्री असतो आणि माझे सरकार असते तर जुन्या पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढावा लागला नसता असे प्रतिपादन केले.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या भव्य अशा मोर्चाला उद्धव ठाकरे हे सामोरे गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना वरिल वक्तव्य केले.

काही वेळापूर्वी पूर्वीचे युतीतील दुसऱ्या पक्षाचा एक नेता म्हणाला, चला आमच्यासोबत. त्यावर मी म्हणालो की, येतो सोबत पण मी खोटे बोलणार नाही असे सांगताच तो दुसऱ्या पक्षाचा नेता काहीही बोलताच निघून गेला अशी टीका भाजपाच्या एका नेत्याची रेडिसन हॉटेलवर झालेल्या भेटीत झालेल्या संवादाची माहिती दिली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी असताना आपणा सर्वांसाठी मी आपले कुंटुंब आपली जबाबदारी म्हणून काम केले. तसेच जून्या पेन्शन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भात नुसती चर्चा सुरु केली. तसेच एका अधिकाऱ्यावर यासंदर्भातील अहवाल सादर करण्याची जबाबदारी सोपवली. तर त्यावेळी सोबत असलेल्या गद्दारांना पाठिंबा काढून घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. का तर त्या कमळवाल्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करायची नव्हती. त्यामुळे ते गद्दारांना सोबत गेल्याची टीका केली.

तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्हाला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत आणि तुमच्या प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानुसार तुम्हाला अच्छे दिन पाह्यला मिळाले का, आले तुमच्या खात्यात १५ लाख आले का असा सवाल उपस्थित करत अशा खोटी आश्वासने देणाऱ्या आणि गद्दारांच्या शक्तीला आपल्याला समुळ टाकायचे आहे त्यासाठी तुम्ही सर्वजण सोबत येणार ना असा सवाल उपस्थित समुदायाला केला असता उपस्थित समुदायानेही उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, काही जण मी आल्यानंतर माझे स्वागत करत होते. त्यावेळी मी सांगितले की, आज माझ्याकडे काहीही नसताना माझे स्वागत कशाला करता. उद्या आमचे सरकार आल्यानंतर तुम्ही आंदोलन करण्याच्या आधीच तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करेन आणि त्यानंतर मी हक्काने तुमच्याकडून हार-तुरे स्विकारणार असल्याचे आश्वासनही यावेळी दिले.

Check Also

संजय राऊत यांची माहिती, हेमंत करकरे आणि आरएसएसमध्ये संघर्ष…

मुंबईवर २६/११रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ल्या झाला. त्यास आता जवळपास १५ ते २० वर्षाचा कालावधी उलटून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *