Breaking News

लोकसभेत अज्ञात दोघांचा प्रेक्षक गॅलरीतून प्रवेशः कॅडल स्मोकचा वापर

संसदेचे हिवाळी अधिवेशन नव्या संसदेच्या इमारतीत सध्या सुरु आहे. मात्र आज दुपारी अचानक दोन अज्ञातांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट लोकसभेच्या सभागृहात उडी मारून सभागृहातील सदस्यांच्या बाकावरुन उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकसभेत एकच गोंधळ निर्माण झाला. त्यातच काही खासदारांनी लगेच अध्यक्षांच्या दालनाकडे धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तीला घेराव घालत त्याला पकडले. मात्र अज्ञात व्यक्तीने बुटात लपवून आणलेल्या कॅडल स्मोक गणचा वापर करत पिवळसर धुराचा मारा सुरु केला. तर आणखी दुसऱ्या एका अज्ञाताने अशाच पध्दतीचे कृत्य केले. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी तातडीने लोकसभेचे कामकाज काही वेळासाठी तहकूब केले. त्यामुळे संसदेतील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला.

दिल्लीत मोदी सरकारच्या कार्यकालात संसदेचे वार्तांकन करणाऱ्यांपासून ते संसदेचे कामकाज पाहायल्या येणाऱ्या अभ्यागंतांपर्यंत येणाऱ्या फक्त मोजक्याच आणि निमंत्रित लोकांनाच संसदेच्या आवारात प्रवेश देण्यात येत असतो. त्यासंबधित संसदेचे सचिव, गृह मंत्रालयाच्या शिफारसीनंतरच कोणालाही प्रवेश दिला जातो. त्यासाठी संसदेत प्रवेश करण्याआधी दिल्ली पोलिसांची सुरक्षा आणि त्यानंतर सीआयएसएफची सुरक्षा कवचातून अभ्यागतांना संसदेत प्रवेश दिला जातो.

मात्र संसदेच्या पीटीआय कार्यालयाकडून असलेल्या प्रवेशद्वारातून संसदेच्या लोकसभा सभेच्या प्रेक्षक गॅलरीत प्रवेश केला. त्यानंतर सुरुवातीला एकाने प्रेक्षक गॅलरीतून त्याने सभागृहात असलेल्या एका सळईला लटकला. त्या पाठाेपाठ दुसऱ्या आणखी एकाने सळईलाच लटकला. आणि त्यानंतर एकामागोमाग सभागृहात उड्या मारल्या. पहिल्या अज्ञात इसमाने थेट खासदार बसलेल्या बाकावरून चक्क थेट उड्या मारत अध्यक्ष बसलेल्या आसनाकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्या इसमाने बऱ्यापैकी अध्यक्षांच्या आसनाच्या काही बाके आधीच काही खासदारांनी सदर अज्ञात इसमाला घेरून त्यांना अडविले. दरम्यानच्या काळात सदर अज्ञात इसमाने पायातील बुट काढून त्यातून धुर येणारे यंत्र वापरण्यास सुरुवात केली.

तरीही तो पहिला इसम सर्व खासदारांच्या गराड्यातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. तर पहिल्या इसमाच्या पाठोपाठ दुसऱ्या इसमानेही पायातील बुट काढून धुर मारणाऱ्या कॅडल स्मोक यंत्राचा वापर करत धुर मारण्यास सुरुवात केली. या सगळ्या घडाोडीतही काही खासदारांनी या दोघांना पकडून सुरक्षा यंत्रणांच्या ताब्यात दिले. विशेष म्हणजे सभागृहात शुन्य प्रहरातील चर्चा सुरु होती.

प्रसंगाचे गांभीर्य ओळखून तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. या अज्ञात व्यक्तींच्या घुसखोरीमुळे काही महिला सदस्यांनी जीव वाचवित सभागृहाच्या बाहेर धुम ठोकली अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

मात्र या दोघांनी कॅडल स्मोकचा वापर करत सभागृहात चांगल्यापैकी पिवळ्या रंगाचा धूर फवारल्याचे स्पष्ट दिसत होते.

याप्रसंगी भाजपाचा एकही वरिष्ठ मंत्री हजर नव्हता. यासंदर्भात काही खासदारांनी सांगितले की, साधारणः १३ वर्षापूर्वी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना संसदेतील यंत्रणा भेदून संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची आठवण सांगितली. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, सभागृहातील प्रेक्षक गॅलरीतून एका मागोमाग दोघांनी आत प्रवेश केला. त्यांनी ज्या धुराचा वापर सुरु केला. त्या धुरामुळे नाकाला जळजळ होत होती आणि फारच घाणेरडा वास येत होता. इतकी मोठी सुरक्षा यंत्रणा भेदून हे दोघे आत घुसलेच कसे असा या निमित्ताने प्रश्न निर्माण होत आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *