Breaking News

राहुल गांधी यांची घोषणा, जमिनीला चारपट भाव देणार…

देशातील जंगल जमिन आणि पाण्यावर पहिला हक्क हा आदिवासींचा आहे. त्यामुळे आदीवासी समुदायाचा हक्क पहिला या देशावर आहे. मात्र आदिवासींना त्यांचे हक्क डावलून देशातील जंगल, जमिन आणि पाणी मोदी त्यांच्या मित्राच्या घशात घालत आहेत. परंतु काँग्रेसची सत्ता आल्यानंतर देशातील आदिवासींचा हक्क त्यांना परत मिळून देणार असून विकास कामांसाठी त्यांची जमिन घ्यायची असेल तर त्यांना जमिनीचा चारपट मोबदला देणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केली.

१५ जानेवारी २०२४ रोजी भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात झाल्यानंतर दिवसात जवळपास उत्तर भारतातील बहुतांष राज्ये आणि केंद्रशासित राज्यांमध्ये जात आज ५९ व्या दिवशी ती गुजरात मार्गे महाराष्ट्रात नंदूरबार मार्गे आज सकाळी पोहोचली. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी आदिवासी समाज आण अनुसूचित जाती वर्गातील नागरिकांवर होत असलेल्या अन्याववरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपा सरकारवर हल्लाबोल केला.

यावेळी बोलताना राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, आदिवासी आणि वनवासी या शब्दातील तुम्हाला फरक माहिती आहे का असा सवाल करत आदिवासी म्हणून या देशात जेव्हा कोणीही नव्हता त्यावेळी आदिवासी होते. त्यामुळे या देशातील सर्व जल, जंगल, जमिन आणि धनसंपदेवर मालकी ही आदिवासी समाजाची आहे. परंतु भाजपाने तुम्हाला वनवासी म्हणून तुम्हाला संबोधित करायला सुरुवात केली. वनवासी म्हणजे जंगलात राहणारा, पण त्याचा जल जंगल जमिनी आणि धनसंपदेवर तुमचा अधिकार नाही. त्यामुळे तुमच्या मालकीची जल जंगल जमिन आणि धनसंपदा ही मोदी हे त्यांच्या जवळचे उद्योगपती मित्र असलेल्यांच्या घशात घालत आहेत. जसे आदीवासी शब्दात तुमचा अधिकार सामावला आहे. तसा वनवासी या शब्दात तो अधिकार सामवला नाही. त्यामुळेच आम्ही तुम्हाला वनवासी म्हणतो. या देशाचे खऱ्या अर्थाने मालक.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, देशातील उद्योग पतींचे १६ लाख कोटी रूपयांचे कर्ज मोदींनी माफ केले. तसेच जंगल जमिनीची सगळी धनसंपदाही त्यांच्या मित्रांच्या घशात घालायला निघाले आहेत. याशिवाय जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या जल जंगल जमिनीसाठी काहीही खर्च तयार नाही. दुसऱ्याबाजूला सर्वसामान्यांना रोजगार मिळावा म्हणून सुरु करण्यात आलेल्या मनरेगा योजनेचा निधी कमी केला. नरेंद्र मोदी यांनी देशातील अरबपती असलेल्या उद्योजकांचा किमान ६५ हजार कोटी रूपयांचे किमान एकाचे कर्ज असेल ते मागील २४-२५ वर्षातील कर्ज माफ केले आहे. परंतु नरेंद्र मोदी यांनी आदिवासी तरूणांचे किंवा अन्य एखाद्याचे एक पैशाचे कर्ज तरी माफ केले का असा खोचक सवालही केला.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, देशातील फक्त २२ उद्योजकांच्या हाती देशातील सर्व उद्योग आहेत. तसेच देशातील सर्व संपत्तीही त्यांच्या हाती आहे. त्यामुळे त्यांची कर्जे कितीही मोठे असले तरी त्यांची कर्जे माफ होतात. पण कामगार असलेल्या आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीय आणि सर्वसाधारण प्रवर्गातील लोकांकडे बाकीची संपत्ती आहे. परंतु ती कामगार म्हणून संपत्ती आहे. त्यामुळे तुमचे कोणतेही कर्ज माफ होत नाही, तुमच्या मालकीच्या संपत्तीची विक्री होत असताना तुम्ही सर्वजण फक्त पहात असता असेही सांगितले.

राहुल गांधी म्हणाले, देशातील मोठ मोठ्या कंपन्या आणि प्रसारमाध्यमात तुमचा एकही नाही. तसेच व्यवस्थापन समितीत एकही व्यक्ती नाही. त्यामुळे एखाद्या धोरणात्मक निर्णयाच्या व्यवस्थापन समितीत एखादा जरी पोहोचला तरी त्याची निर्णय प्रक्रियेतील सहभाग हा फक्त २० टक्केच आहे. त्यामुळे तुमच्या जल जंगल जमिन आदी गोष्टीं उद्योगांना विकली जाते तेव्हा तुम्ही फक्त बघत असता. तुमच्यावर अन्याय होत असला तरी तुम्ही कोणतेही पाऊल उचलू शकत नाही असे सांगितले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भारतात कोणत्या जात समुहात कोणाची संख्या किती आहे याची माहिती कोणाकडे नाही. त्यामुळे सर्वांवर अन्याय होत आहे. पण हा अन्याय होतोय हेच समजत नाही. त्यामुळे कोणत्या समुदायाची किती संख्या आहे, त्यांचा सहभाग किती हे निश्चित करण्यासाठी जातनिहाय जणगणना होण्याची गरज आहे. याशिवाय प्रत्येक जातीचा आर्थिक सर्व्हेक्षण करणे गरजेचे आहे. जेणेकरून देशाच्या प्रत्येक गोष्टी तुम्हा सर्वांची जी काही ८ टक्क्याची भागीदारी आहे ती सुनिश्चित करणार असल्याची ग्वाहीही यावेळी दिली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *