Breaking News

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या चौकशीवरील निर्णय तात्काळ द्यावा काँग्रेसची लोकायुक्तांकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी
गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी ताडदेव, मुंबई येथील एम. पी. मिल झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रकरणी विकासकाला लाभदायी ठरेल, असा निर्णय घेतला. हे प्रकरण काँग्रेस पक्षाने उघड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी ऑगस्ट २०१७ मध्ये लोकायुक्तांकडे चौकशी सोपविली होती. पण अद्याप या प्रकऱणी निकाल आला नाही. तो तात्काळ द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत लोकायुक्तांना पत्र लिहून केली आहे.
ऑक्टोबर २०१८ ला या प्रकरणाची लोकायुक्त कार्यालयात शेवटची सुनावणी झाली होती असे समजते. या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता लोकायुक्त कार्यालयात संपर्क केला असता हे प्रकरण अतिशय गोपनीय असून या संदर्भातील माहिती केवळ लोकायुक्तांच्याच कक्षात उपलब्ध आहे, असे सांगितले गेले. या संदर्भात चौकशी सुरु होऊन दोन वर्ष होत आली व सुनावणी होऊन सहा महिने झाले पण अद्याप निर्णय आलेला नाही. महाराष्ट्र तसेच देशातील जनतेचे या प्रकरणाकडे लक्ष लागून असल्याने आपण लवकरात लवकर निकाल द्यावा आणि या प्रकरणातील गोपनीयतेवरून पडदा उठवावा ही अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *