Breaking News

देशाची लोकशाही पुढाऱ्यांनी नव्हे तर सामान्य जनतेने मजबुत केली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांकडून तरूण पिढीची कौतुक

अहमदनगर – कर्जतः प्रतिनिधी
या देशाची लोकशाही पुढाऱ्यांनी मजबुत केली नाही तर तुम्ही लोकांनी, सामान्य जनतेने मजबुत केल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगरच्या कर्जत येथील जाहीर सभेत व्यक्त केले.
मतांचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याचा वापर जनतेने नीट केला. मात्र बाजुच्या देशात विशेषतः पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका तिथेही लोकशाही होती. परंतु लष्कराने ताबा घेतला व हुकुमशाही आली. मात्र आपल्या हिंदुस्थानात असं कधी झालं नाही. कारण तुमच्यासारखी जनता व सामान्य घटक कितीही अडचणी असतील, दुखणी असतील त्यावेळी देशाचा विचार करते. लोकशाही अडचणीत येते त्यावेळी सर्व एक होतात असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. उमेदवार संग्राम जगताप, युवा नेते रोहित पवार, आमदार अरुणकाका जगताप, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, दादाभाऊ कळमकर, राजेंद्र फाळके, राजेंद्र नागवडे, प्रविण घुले, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, आदींसह महाआघाडीचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
माझ्यासारख्याला चव्हाण साहेबांनी संधी दिली. शिवाय गोविंदराव आदिक यांनाही दिली. म्हणुन मला काम करायला मिळाले. नवीन युवक तयार करायला मिळाले. मी आता सहा महिन्याने ८० वर्षाचा होईन. म्हणुन माझ्यासारख्याची जबाबदारी आहे की, महाराष्ट्राच्या जनतेने शक्ती दिली. पाठिंबा दिला. कॉंग्रेसच्या विचाराने साथ दिली. पुढची ५-५० वर्ष महाराष्ट्र नवीन युवकांच्या हातात जाईल व नवीन पिढी कशी निर्माण होईल याची काळजी घेतली पाहिजे या हेतुने संग्राम जगताप यांची निवड केल्याचे त्यांनी सांगितले.
संग्राम जगताप, परभणीतून राजेश वीटेकर आणि राणा जगजितसिंह पाटील ही सगळी नवीन पिढी पुढे का आणतोय हे सांगतानाच पुढच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची दृष्टी असलेले आणि काम करण्याची कुवत असलेली ही फौज तयार करत असल्याचेही ते म्हणाले.
आजच्या तरुणांना इथे थांबवून चालणार नाही. मीही दिल्लीत आहे. त्यामुळे माझ्यासोबत तरुणांची फौज असली की माझ्या नजरेमध्ये केंद्र सरकार कुणाचंही असलं तरी त्यांच्या माध्यमातून तरुणांचे विकासाचे प्रश्न सोडवून त्यांच्या पाठीशी उभं राहता येईल. या हेतूने पाऊले आहेत आणि त्यादृष्टीने निवडणूकांकडे पहात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ही निवडणूक महत्त्वाची आहे. सार्‍या जगाचं लक्ष लागलं आहे. गांधी, नेहरू यांनी लोकशाही जपली आहे. काही लोकांना ही शेवटची निवडणूक आहे अशी भीती वाटत आहे. तसं आपल्या भाषणात बोलत आहेत परंतु मला वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *