Breaking News

अमृता फडणवीसांच्या उपस्थितीतच रामदेवबाबा म्हणाले, ..कपडे ना पहने तो भी अच्छा है

योगगुरू आणि पतंजलीचे प्रमुख बाबा रामदेव हे नेहमी आपल्या कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यांनी सतत चर्चेत असतात. मात्र आता तर त्यांनी महिला विषयी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या उपस्थितच वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले. रामदेवबाबाच्या या वक्तव्यावरून महिला वर्गात संतापाची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे.

पतंजलीच्या एका मोफत योग शिबिरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदें मंचावर उपस्थित होते. त्यावेळी योगगुरू रामदेवबाबा यांनी  ‘महिला साडीमध्ये छान दिसतात, सलवार – सुटमध्येही (पंबाजी ड्रेस) छान दिसतात. आणि माझ्या नजरेने पाहिले तर, त्यांनी काही घातले नाही तरी छान दिसतात. असे महिला विषयी शिबिरात म्हणाले.

पतंजली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनाचे आयोजन शुक्रवारी ठाण्यातील हायलँड भागात करण्यात आले होते. या संमेलनास अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यावेळी बाबा रामदेव हे महिलांशी संवाद साधत होते. त्यावेळी महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले.

रामदेव बाबा यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील चांगल्याच भडकल्या आहेत. त्यांच्या वक्तव्या बाबत रामदेव बाबांवर हल्लाबोल करताना म्हटले आहे की, बाबा, तुम्ही आता  शिर्षासन करा म्हणजे तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा नीट सुरळीत होईल…” असं त्या म्हणाल्या आहेत. खरं तर त्याचवेळी अमृता फडणवीस यांनी रामदेव बाबांच्या सन्नदिशी कानाखाली ओढली पाहिजे होती. असा हल्लाबोल रूपाली पाटील यांनी केला. महिलांनी काय घालायाच काय नाही त्यांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. अमृता फडणवीसांनी तेव्हाच बाबा रामदेव यांच्या कानाखाली मारायला हवी होती. महिलांनी साडी, सलवार घालणे ईथपर्यंत ठीक होतं पण त्याही पुढे जाऊन त्याांनी जे विधान केलं ते कितपत योग्य याचा विचार करायला हवा. रामदेव बाबा डोकं खाली पाय वर करा म्हणजे तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा नीट होईल. बाबा रामदेव यांना अक्कल नावाचा प्रकार आहे का नाही असा सवाल करून रामदेव बाबा पुण्यात आल्यावर त्यांना काळ फासणार आहोत. राज्याच्या गृहखात्याने बाबा रामदेव यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

Check Also

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *