Breaking News

राजकारण

अतुल लोंढे यांचे आव्हान, ॲड. असीम सरोदे यांनी केलेल्या आरोपावर मुख्यमंत्री शिंदेंनी खुलासा करावा

महाविकास आघाडीचे सरकार कट कारस्थान करून पाडताना गुवाहाटीच्या पंचतारांकित हॉटेलमधील घडलेल्या प्रकरणाचा ॲड असिम सरोदे यांनी केलेला गौप्यस्फोट अत्यंत गंभीर आहे. पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग व लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला हे महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारे असून हा प्रकार करणारे आमदार कोण? याचा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व …

Read More »

भाजपाचा पलटवार, अंधभक्त आणि श्रध्येतील फरकच उद्धव ठाकरेंना कळत नाही

अंधभक्त आणि श्रद्धा यातील फरकच दुर्दैवाने उद्धव ठाकरेंना समजत नाही. बाळासाहेबांप्रती लाखो शिवसैनिकांची, सर्वसामान्य जनतेची श्रद्धा होती. ते अंधभक्त नव्हते. आजही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गरीबाच्या कल्याणाकरीता करत असलेली कामे व विकासकामे यामुळे देशातील जनतेच्या श्रद्धा मोदींच्या प्रती आहेत. तुम्ही डोळ्याला झापड बांधली असल्यामुळे श्रद्धा तुम्हाला अंधभक्तासारखी दिसून येते, असा खरमरीत …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, अब की बार भाजपा तडीपार

आगामी लोकसभा निवडमूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकिय पक्षांनी एकाबाजूला निवडणूकीची तयारी जोरात केलेली असतानाच जनता दल संयुक्तचे प्रदेशाध्यक्ष कपिल पाटील यांनी जनता दल संयुक्त पक्षाला सोडचिठ्ठी देत नव्या पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्यावतीनं आयोजित पहिल्याच मेळाव्याला मार्गदर्शन आणि राजकिय मित्र म्हणून शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी …

Read More »

प्रकाश आंबेडकर म्हणाले, बैठकीला नाही तर शरद पवार यांनी चर्चेला बोलावलंय

देशातील विरोधकांची इंडिया आघाडी लोकसभा निवडणूकीपूर्वीच फाटाफुटीच्या उंबरठ्यावर पोहोचली. परंतु तरीही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार वगळता इतर सहभागी पक्षांशी काँग्रेसने यशस्वीरित्या जागा वाटपाच्या चर्चा सुरु ठेवल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीती घटक पक्षांनी अद्याप काँग्रेस आणि शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील चर्चा अद्यापही प्राथमिकस्तरावर …

Read More »

छगन भुजबळ यांचा निश्चय, शेवटपर्यंत फक्त ओबीसीसाठीच

ओबीसी समाजातील अनेक जातीत पोटजाती आहे. जर आपल्या आपले न्याय हक्क मिळवायचे असतील तर ओबीसी घटकांनी एकत्र येऊन काम करायला हवं. तसेच ओबीसीमध्ये असलेल्या भोई समाज बांधवांनी सर्व पोटजातीनी एकत्र येऊन भोई म्हणून एक छताखाली यायला हवं असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी …

Read More »

प्रकाश आंबेडकर का म्हणाले? मविआच्या बैठकांना जाऊ नका

राज्यातील राष्ट्रीय आणि प्रादेशिकस्तरावरील राजकिय पक्षांसोबतच्या आघाडीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर कधी अडकून नाहीत. परंतु प्रत्येक निवडणूकीत त्यांनी नेहमीच स्वतःचे अस्तित्व दाखवून दिल्याचे दिसून आले आहे. काल संध्याकाळी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील लोकसभा मतदारसंघातील जाहिर सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आणि महाविकास आघाडी …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा मोदींना इशारा, आम्ही १५० च्या वर जाऊ देणार नाही

राजकीय दृष्टिकोनातून आज आपण पाहिलं की, जो ओबीसी, धनगर, साळी, माळी, लोहार, सोनार इत्यादी जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे जागृत झाला. त्याच्या हक्काची आणि अधिकाराची त्याला जाणीव झाली. आज तो स्वतःच्या अधिकारांची सुरक्षा करायला निघाला आहे. म्हणून महाविकास आघाडीला सांगितलं की, जर आपली युती झाली, तर त्यामध्ये किमान १५ उमेदवार हे ओबीसींचे …

Read More »

क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे आणि उरळी देवाची येथील नगर रचना परियोजनेअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. संगमवाडी परिसरात …

Read More »

भाजपाच्या निवडणूक संकल्पपत्रासाठी महाराष्ट्रातून १० लाख सूचना

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक संकल्पपत्रासाठी महाराष्ट्रातून १० लाख सूचना पाठविणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्यभरातील ३३ हजार ३२३ भाजपा कार्यकर्ते सूचना पत्राची पेटी घेऊन घरोघरी पोहचणार असून सर्व सूचना भाजपा केंद्रीय कार्यालयात पाठविण्यात येणार आहेत. नागपूर येथे पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. भाजपाच्या …

Read More »

भाजपाकडून १९५ लोकसभा उमेदवारांची घोषणा; पहिली यादी जाहिर

लोकसभा निवडणूकीचा कालावाधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे आचारसंहिता लागू होण्याची शक्यता अधिक गडद होत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाने १९५ लोकसभा मतदारसंघाची अंतिम यादी आणि उमेदवारांची घोषणा आज केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गतवर्षीच्या दोन्ही टर्मनंतर तिसरी टर्मही वाराणसी मधून लोकसभेचे निवडणूक लढविणार आहेत. तर अमेठीतून स्मृती ईराणी आणि लखनऊमधून …

Read More »