देशातील विरोधकांची इंडिया आघाडी लोकसभा निवडणूकीपूर्वीच फाटाफुटीच्या उंबरठ्यावर पोहोचली. परंतु तरीही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार वगळता इतर सहभागी पक्षांशी काँग्रेसने यशस्वीरित्या जागा वाटपाच्या चर्चा सुरु ठेवल्या आहेत. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीती घटक पक्षांनी अद्याप काँग्रेस आणि शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील चर्चा अद्यापही प्राथमिकस्तरावर आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजपाने १९५ लोकसभा उमेदवारांची यादी जाहिर करत प्रचाराच्या कामालाही सुरुवात केली. या सगळ्या घडामोडींवर प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या बैठकांना आणि कार्यक्रमांना जावू नये असे आदेश दिले.
यापार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर अकोला येथे बोलताना म्हणाले की, ६ मार्चला महाविकास आघाडीची बैठक नाही तर शरद पवार यांनी चर्चेला बोलावले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीबाबतच्या जागा वाटपाचा निर्णय होणार आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी महाविकास आघाडी झाली नाही तर काय पुढे असा सवाल केला असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ६ मार्चच्या बैठकीनंतर त्यासंदर्भात बोलता येईल. त्याविषयी आताच बोलणे उचित होणार नाही. मात्र जर आघाडी नाही तर वंचित स्वतंत्ररित्या निवडणूकीला सामोरे जाईल. याशिवाय महाविकास आघाडी होत असल्याने मी उत्तर प्रदेश, बिहार येथे प्रचारालाही गेलो नाही. तरी तिथली १० टक्के मतं इथे बसून फिरवू शकतो. मला जिथे जाण्याची गरज सुध्दा नाही असे सांगितले.
तसेच पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जर महाविकास आघाडी झाली नाही. तर आम्ही स्वतंत्र लढू आणि भाजपा विरूध्द वंचित बहुजन आघाडी यांच्यातच सामना होईल, असे भाकितही यावेळी वर्तविले.
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, धर्मनिरपेक्ष मतदारांना आश्वासित करण्यासाठी आणि काही घटक पक्षांचा इतिहास लक्षात घेता जे घटक पक्ष आहेत, त्यांनी धर्मनिरपेक्ष मतदाराला यापुढे आम्ही भाजपासोबत जाणार असे आश्वासित करावे. आणि घटक पक्षांना शक्य असेल, तर त्याचा लेखी मसुदा युतीच्या वेळी जाहिर करावा अशी भूमिकाही यावेळी मांडली.
तसेच यावेळी बोलताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बारामतीत सुप्रिया सुळे विरूध्द सुनेत्रा पवार अशी लढत होईल का आणि झाली तर कोण जिंकेल असा सवाल केला. त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बारामतीत दोन मेव्हण्या राहतात असे सांगत थेट प्रश्नावर बोलण्याचे टाळले.