Breaking News

भाजपाकडून १९५ लोकसभा उमेदवारांची घोषणा; पहिली यादी जाहिर

लोकसभा निवडणूकीचा कालावाधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे आचारसंहिता लागू होण्याची शक्यता अधिक गडद होत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाने १९५ लोकसभा मतदारसंघाची अंतिम यादी आणि उमेदवारांची घोषणा आज केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गतवर्षीच्या दोन्ही टर्मनंतर तिसरी टर्मही वाराणसी मधून लोकसभेचे निवडणूक लढविणार आहेत. तर अमेठीतून स्मृती ईराणी आणि लखनऊमधून राजनाथ सिंग यांना उमेदवारी देण्यात आल्याचे माहिती भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज केली.

भाजपाच्या नवी दिल्ली येथील पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वरील माहिती दिली.

विनोद तावडे पुढे बोलताना म्हणाले की, मागील दोन दिवसांपासून भाजपाच्या केंद्रीय संसदीय मंडळाची सातत्याने बैठक सुरु होती. त्यामध्ये देशातील विषेशतः उत्तर भारतातील १९५ लोकसभा मतदारसंघातील निवडूण येऊ शकणाऱ्या उमेदवारांच्या नावावर केंद्रीय निवडणूक समितीत शिक्का मोर्तब करण्यात आले. याशिवाय या निवडणूकीत चार माजी मुख्यमंत्र्यांनाही पहिल्यांदाच लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरविण्यात आल्याचेही सांगितले.

विनोद तावडे म्हणाले की, विद्यमान मंत्रिमंडळातील सर्व सदस्य या निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तसेच चार राज्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांनाही यावेळी लोकसभा निवडणूकीत उतरविण्यात आले आहे. यामध्ये आसामचे सर्वानंद सोनोवाल, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान याना ज्योदिरादित्य सिंदींया यांच्या विदिशा या मतदारसंघातून उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. तसेच अन्य दोन माजी मुख्यमंत्र्यांनाही लोकसभा निवडणूकीची उमेदवारी जाहिर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

भाजपाकडून लोकसभा उमेदवारांची जाहिर झालेली यादी खालील प्रमाणे…..

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *