Breaking News

भाजपाच्या निवडणूक संकल्पपत्रासाठी महाराष्ट्रातून १० लाख सूचना

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या निवडणूक संकल्पपत्रासाठी महाराष्ट्रातून १० लाख सूचना पाठविणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

राज्यभरातील ३३ हजार ३२३ भाजपा कार्यकर्ते सूचना पत्राची पेटी घेऊन घरोघरी पोहचणार असून सर्व सूचना भाजपा केंद्रीय कार्यालयात पाठविण्यात येणार आहेत.

नागपूर येथे पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. भाजपाच्या आगामी कार्यक्रमाची माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ४ तारखेला नागपूर येथे राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. संमेलनासाठी राज्यभरातील १८ ते ३५ वयोगटातील १ लाख युवक सहभागी होतील.

अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ५ तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अकोला व जळगाव व संभाजीनगर येथील कार्यक्रमात उपस्थित राहणार असून ते अकोला येथे चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला व अमरावती या लोकसभा क्षेत्रातील निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी २ वा. जळगाव येथे युवा महासंमेलनात मार्गदर्शन करतील. सायंकाळी ६ वा. संभाजीनगर येथे अहमदनगर, शिर्डी, जालना व संभाजीनगर लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार असल्याचेही सांगितले.

नारी शक्ती वंदन कार्यक्रम

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ६ तारखेला राज्यातील सर्व २८८ विधानसभांमध्ये ५ हजार महिलांच्या उपस्थितीत नारीशक्ती वंदन कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला ऑनलाईनच्या माध्यमातून संबोधित करतील अशीही माहिती दिली.

लाभार्थ्यांशी थेट संपर्क

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ७ ते १५ मार्च पर्यंत राज्यभर भाजपा कार्यकर्ते मागील १० वर्षांत मोदी सरकारने राबविलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नमस्कार पोहचविणार आहेत, असेही सांगितले.

पत्रकार परिषदेतला भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजयुमोचे प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, जिल्हा महामंत्री अनिल निधान उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे असेही म्हणाले की, नितीन गडकरी यांचा व्हायरल व्हिडीओ खोटारडा असून काँग्रेसला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. नागपूर लोकसभा भाजपा ६५ टक्के मतांनी जिंकणार आहे. शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद नव्हे तर मनभेद झाले आहेत. ठाकरेंची अवस्था हम दो हमारे दो अशी होणार असल्याची टीका करत प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आंबेडकर मोदींच्या सोबत येतील असे वाटत नाही असेही सांगितले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *