Breaking News

राजकारण

मराठा समाजाला आरक्षण; महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून एकमताने संमत करण्याचा राज्यातील महायुती सरकारने आज ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. या ऐतिहासिक निर्णयाचे मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे …

Read More »

मोठी बातमीः मराठा आरक्षणाचे विधेयक आधी आवाजी तर नंतर एकमताने मंजूर

मागील काही वर्षापासून चिघळलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज पुन्हा नवे विधेयक सादर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेले मराठा समाजाला शैक्षणिक आणि शासकिय-निमशासकिय नोकरीत आरक्षण देणारे विधेयक अखेर आधी सत्ताधारी बाकावरील आमदारांच्या आवाजी मतदानाने तर नंतर विरोधकांनी पाठींबा असल्याचे जाहिर केल्यानंतर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर …

Read More »

कुपवाडा येथील भारत- पाक नियंत्रण रेषेजवळ झाला शिवजयंतीचा सोहळा

काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. हिमवर्षावात देखील काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष दुमदुमला. …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, चंदिगढ महापौर निवडणूकीतील बॅलेट पेपर दाखवा

काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची मते अधिक असतानाही चंदिगढ महापौर निवडणूकीत अल्पमतात असणाऱ्या भाजपाचा उमेदवार विजयी झाला अशी घोषणा निवडणूक आयोगाने जाहिर केली. मात्र त्यास काही तासांचा अवधी लोटत नाही तोच निवडणूक आयोगाचा एक अधिकारी मतदानासाठी वापरण्यात आलेल्या बॅलेट पेपरवर स्वतःच शिक्के मारत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, जयंत पाटील कोणाच्या संपर्कात माहित नाही

पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक लोक सोबत येण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे कुणालाही नाही म्हणणार नाही, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त करत जयंत पाटील यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या …

Read More »

जयंत पाटील एकाच वाक्याच उत्तर, मला कुणीही संपर्क केला नाही, मी कोणालाही संपर्क केला नाही

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच भाजपात प्रवेश करतील अशा बातम्या अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र जयंत पाटील यांनी आज मुंबईतील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेत या बातम्यांची हवाच काढली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत म्हणाले की, मला कुणीही संपर्क केला नाही, मी कोणालाही …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा उपरोधिक सवाल, आता त्यांना आमचे लोकही हवे आहेत….

भाजपाकडे ऐवढी ताकद असताना सुद्धा आमच्याकडचे लोक हवेसे वाटत असतील तर, काही तरी दम आहे ना, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शेतकऱ्यांसाठी कांदा निर्याती सारख्या महत्त्वाच्या विषयाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, नितेश राणेवर कारवाईची धमक महाराष्ट्र पोलिसांमध्ये नाही का?

कटकारस्थान करून महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत आलेले असंवैधानिक खोके सरकारच्या काळात सत्ताधारी आमदार, खासदारांची गुंडगिरी वाढली आहे. भारतीय जनता पक्षाचा आमदार नितेश राणे राजरोसपणे धमक्या देत आहे, हातपाय तोडू, डोळे काढू, अशी भाषा करतो, चिथावणीखोर भाषण देतो, आपला बॉस ‘सागर’ बंगल्यावर बसला आहे, पोलीस आपले काहीच वाकडं करु शकत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, रायगडाप्रमाणे शिवनेरीचाही विकास करणार

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटनस्थळे विकसित होत आहेत, त्यात किल्ले रायगडप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

जितेंद्र आव्हाडांचा आरोप,…लोकांच्या पैशातून भाजपा आणि मोदींचा निवडणूक प्रचार

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोठमोठ्या घोषणा करत भाजपाला तिसऱ्यांदा संधी देण्याची मागणी भाजपा कार्यकर्त्यांसमोर करत देशाच्या विकासासाठी, गरिब जनतेला मोफत अन्न मिळण्यासाठी आणि देशाला पहिल्या तीन विकसित राष्ट्राच्या यादीत बसविण्यासाठी भाजपाला तिसऱ्यांदा संधी हवी असल्याची मागणी केली. तसेच यावेळी एकट्या भाजपाला ३७० जागा मिळवाव्याच लागतील असेही स्पष्ट केले. देशातील …

Read More »