Breaking News

सुप्रिया सुळे यांचा उपरोधिक सवाल, आता त्यांना आमचे लोकही हवे आहेत….

भाजपाकडे ऐवढी ताकद असताना सुद्धा आमच्याकडचे लोक हवेसे वाटत असतील तर, काही तरी दम आहे ना, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शेतकऱ्यांसाठी कांदा निर्याती सारख्या महत्त्वाच्या विषयाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका करताना म्हणाल्या की, मी वारंवार निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली होती, मात्र, कांदा निर्यातीवरील बंदी ही पूर्णपणे उठवावी, या संदर्भात आपण वारंवार केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली आहे, या संदर्भातील पाठपुरावा सुरु ठेवणार असल्याचेही सांगितले.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्याबद्दल दररोज चर्चा असतात. जेव्हा भाजपाकडे २०० आमदार आणि ३०० खासदार ऐवढी मोठी ताकद असले तरी, त्यांना आमचे लोक हवे आहेत. याचा अर्थ आमच्यात काही तरी गंमत आहे ना, काही तरी टॅलेंट आहे. त्याशिवाय ऐवढी ताकद असताना. आम्ही जे छोटे पक्ष राहिलेले आहे. ते पण हवे आहे तर, काही तरी दम आहे ना असा खोचक टीकाही भाजपावर केली.

भाजपावर टीका करताना सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, भाजपामध्ये किती अहंकार आहे. हे भाजपाचे संस्कार आहेत का? मला आश्चर्य वाटते की, मी भाजपाला फार जवळून पाहिले आहे. अटल बिहार वाजपेयीपासून ते सुषमा स्वराजपर्यंत एवढे मोठे नेते आम्ही पाहिले आहेत. पण त्या नेत्यांमध्ये अहंकार नव्हता. आताची भाजपा अहंकाराची भाषा करते, याचे मला आश्चर्य वाटत आहे. ऐवढा संस्कृत पक्ष आता काय झाले त्या पक्षाला? असा खसोचक सवालही यावेळी उपस्थित केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्ही विचार करा, भाजपाने पक्ष फोडले आणि घरे फोडली. आता राज ठाकरेंना भेटायला चालले आहेत म्हणजे भाजपाने कितीही पक्ष फोडण्याचे राजकारण केले आणि विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केल्यानंतरही भाजपाला निवडणुकीत विजय होण्याचा आत्मविश्वास वाटत नाही अशी टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपाचे भ्रष्टाचार जुमला पार्टी हे मॉडेल तयार झाले आहे. ज्याच्यावर आरोप करतात दुसऱ्या दिवशी तोच नेता भाजपामध्ये जातो. पण या सगळ्यामध्ये भाजपाकडे एवढी मोठी ताकद असताना त्यांना आमच्या सारख्या छोट्या पक्षांमधील लोकांची गरज लागते म्हणजेच आमच्यात काही तरी टॅलेंट नक्कीच आहे. भाजपा आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा आहे. भाजपानं पक्ष फोडले, घरं फोडले एवढेच नव्हे तर, इन्कम टॅक्स, ईडीचा ससेमीरा अनेकांच्या मागे लावला. एवढं झाल्यानंतरही भाजपाचं राजकारण संपलेले नाही असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

यावेळी देशातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध भागात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यात पुणे, नागपूर आणि ठाणे या तिन्ही ठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे. वाढती गुन्हेगारी हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. मी राजीनामा मागितला की माझ्यावर टीका केली जाते. परंतु, राज्याचे गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडे आल्यापासून राज्यातील गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्रालयाचे ऑडिट करणे गरजेचे असल्याची मागणी यावेळी केली.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *