Breaking News

विरोधकांच्या बहिष्कारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरवर भाष्य दोन तास झाले तरी पंतप्रधान मोदी काही बोलेना

मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव आणला. या अविश्वास प्रस्तावारील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं. मात्र देशातील इंडिया या विरोधकांच्या आघाडीतील सदस्यांनी दोन झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरच्या विषयावर काहीच बोलेना म्हणून दोन तासानंतर लोकसभेतून मोदी यांच्या भाषणावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. त्यामुळे मोदी यांचे विरोधकांच्या रिकाम्या बाकांकडे पहात उत्तर दिले. दरम्यान एक नवा व्हिडिओ समोर आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लांबलेल्या भाषणाला कंटाळून भाजपाचे अनेक नेते अमित शाह यांच्यासह अनेकांनी जाभांळ्या देणे, डुलक्या घेतल्याचे उघडकीसल आले.
यावेळी विरोध पक्षांनी केलेले आरोप खोडून काढत पंतप्रधान मोदींनी सडेतोड प्रत्युत्तर देत मणिपूरचा वापर राजकारणासाठी करू नका असं आवाहन केलं. पंतप्रधान मोदींचं भाषण संपल्यानंतर सभागृहात विरोधकांनी मांडलेला सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला.

मणिपूरमधील परिस्थितीबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी सविस्तर माहिती दिली आणि भूमिका मांडली. सरकार आणि देशाची चिंता त्यांनी व्यक्त केली. देशातील जनतेला जागरूक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. विरोधी पक्षांकडून मणिपूरवर राजकारण केलं जात आहे, असा आरोप पीए मोदींनी केला. मणिपूरमध्ये गंभीर स्थिती आहे. तिथे अक्षम्य गुन्हे झाले आहेत. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. ज्या प्रकारे प्रयत्न सुरू आहेत, ते पाहता लवकरच शांततेचा सूर्य नक्की उगवेल, असा विश्वास व्यक्त केला.

संपूर्ण देश आणि सभागृह मणिपूरच्या जनतेसोबत आहे. मणिपूर पुन्हा विकासाच्या मुद्द्यांवर वाटचाल करेल. यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. मणिपूरबाबत सभागृहात जे काही सांगितलं गेलं त्याने नागरिकांच्या मनाला ठेच पोहोचली आहे. तिथे भारतमातेची हत्या होतेय, असं काही लोकांना का वाटतंय, माहित नाही. हेच लोक संविधानाची हत्या होत असल्याचे बोलत आहेत. हैराण झालो आहे, असं बोलणारे हे कोण आहेत? देशाच्या फाळणीचा तो दिवस अजूनही आपल्याला वेदना देतो. हे तेच लोक आहेत ज्यांनी भारतमातेचे तीन तुकडे केले. भारतमाते भोवतीचे साखळदंड तोडण्याऐवजी त्यांनी हातच कापले, असा घणाघाती आरोप पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर केला.

आमच्यासाठी ईशान्य भारत अतिशय खास आहे. मणिपूरमध्ये वंदे भारतपासून ते पहिल्या क्रीडा विद्यापीठाचा उल्लेख करत पीएम मोदींनी विकासकामांची माहिती दिली. सबका साथ सबका विकास ही फक्त घोषणा नाही तर आमचा विश्वास आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

युपीएला वाटते की देशाच्या नावाचा वापर करून विश्वासार्हता वाढले. पण काँग्रेसचे सहकारी पक्ष असलेल्या तामिळनाडूमधील सरकारच्या एका मंत्र्याने दोन दिवसांपूर्वी असे म्हटले होते की, इंडिया आमच्यासाठी महत्त्वाचे नाही. त्यांच्यामते तामिळनाडू भारतात नाहीच. मी आज आभिमानाने सांगू इच्छितो की तामिळनाडू असा प्रदेश आहे ज्याने नेहमी देशभक्ती दाखवली. ज्या राज्याने आम्हाला राजा जी दिले, कामराज यांना दिले, एनजीआर, कलाम दिले त्या राज्यातून आज अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत.

इतके नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी I.N.D.I.A. आघाडीवर हल्ला चढवला. मोदी म्हणाले, “त्यांचा त्रास एवढा आहे की, स्वतःचे अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी त्यांना एनडीएचा आधार घ्यावा लागला. पण सवयीप्रमाणे ‘मी’चा अहंकार त्यांना एकटा सोडत नाही. त्यामुळेच त्यांनी दोन ‘मी’ टाकले. NDA मधील अहंकार. पहिला ‘I’ – २६ पक्षांचा अहंकार आणि दुसरा ‘I’ – एका कुटुंबाचा अहंकार. त्यांनी NDA सुद्धा चोरला. त्यांनी भारतालाही तोडले”.
काँग्रेस पक्षावर हल्ला चढवताना मोदींनी म्हटले की, त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी या त्यांच्या नाहीत. निवडणूक चिन्हासह सर्व काही आपले असल्याचा दावा काँग्रेस करत असते. पण प्रत्यक्षात ते दुसऱ्यांकडून चोरले आहे. स्वत:चे दोष लपवण्यासाठी त्यांनी चिन्ह आणि विचार देखील चोरले. पक्षाचे संस्थापक एक विदेशी व्यक्ती होते. १९२० साली देशाच्या स्वतंत्र्य लढ्यात नवी उर्जा मिळाली तर त्यांनी ध्वज देखील चोरला. काँग्रेसने या ध्वजाची ताकद ओळखली आणि तोच स्विकारला. मतदारांना आकर्षिक करण्यासाठी गांधी नावाची देखील चोरी केली.

दरम्यान, तृणमुल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना गोंधळ घातल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *