Breaking News

माझे (स्व.बाळासाहेब) वडील भोळे होते, पण त्यांचे खपवून घेणार नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा भाजपाला इशारा

आता सगळ्या गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे उद्योग आणि गुंतवणूक मोठ्या पुन्हा येण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे दृष्यपरिणामही दिसायला लागतील. महाविकास आघाडीची सारी सुत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हातात असल्याबाबत आरोप करण्यात येत आहेत. कोणी काहीही आरोप करो. पण आमच्या सरकारचे उत्तम चालले आहे. शरद पवार हे वडीलधाऱ्यांप्रमाणे येतात मुद्देसुद बोलतात आणि बाकी आमच्यात इकडचे-तिकडच्या गप्पा होतात असेही त्यांनी स्पष्ट करत सरकारचे छान चाललेय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त एका वर्तमान पत्राने त्यांची दृक्यश्राव्य माध्यमातून मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

आता जरी आरे कॉलनीतील जागा चांगली असल्याचे सांगण्यात येत असले तरी भविष्यकाळात पुन्हा कारशेडसाठी जागा शोधावी लागणार आहे. त्यामुळे आपण आताच मेट्रो कारशेड कांजूर मार्गाला हलविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे नव्याने जागा शोधण्याची गरज पडणार नाही. तसेच ही जागा मला कोणा धनदांडग्यासाठी नको आहे तर ती मला माझ्या महाराष्ट्रासाठी आणि मुंबई करांसाठी हवी आहे. आणि ती जागा मेट्रोसाठी मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नाणार प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध आहे. त्यामुळे तो प्रकल्प नाणारला होणार नाही. परंतु त्यास पर्यायी ठिकाणी उभारण्याबाबत सध्या विचार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

आदित्यचं पर्यावरण आणि पर्यटन विभागाचे काम उत्तम पध्दतीने करत असल्याचे प्रशस्ती पत्रक देत तो अनेक नव्या गोष्टी घेवून येत आहे. विविध कार्यक्रमातही तो सहभागी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सत्ताधारी आणि विरोधकामध्ये संघर्ष सातत्याने होत असल्याचे दिसत असले तरी माझ्याकडून नरेंद्र मोदी आणि माझ्यामध्ये वैयक्तीक संबध अद्याप चांगले असल्याचे मी मानतो. मात्र ते संबध आहेत का? की होते? हे दोन्हीबाजूने ठरवून सांगावे लागले. माझ्याकडून म्हणाल तर माझ्याकडून ते वैयक्तीक संबध आजही आहेत. पण त्यांनी त्याबाबत सांगावं अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.

माझे (बाळासाहेब) वडील भोळे होते. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदूत्वाचा नारा देवून फायदे लाटत होते. मात्र मी भोळा आहे असे वाटत असेल तर मी भोळा नाही त्यांच्याकडून जे काही सुरु आहे ते मी कदापी चालू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी भाजपाचे नाव न घेता दिला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *