Breaking News

फडणवीसांनी दिला इशारा, चालू बिलात चालूगिरी करू नका अन्यथा… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात हक्कभंग आणू

सोलापूर जिल्ह्यातील सुरज जाधव या तरूण शेतकऱ्याने वीज बिल आणि तोडणीवरून आत्महत्या केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहातच घोषणा केली होती शेतकऱ्यांच्या वीजेची तोडणी करणार नाही म्हणून असे असताना तरीही वीज तो़डणी केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत चालू बिलात चालू गिरी करू नका नाहीतर उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा दिला.

विधानसभेत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे वीजेच्या प्रश्नावर बोलत असताना त्यावर फडणवीस यांनी त्यांना उपप्रश्न विचारून शेतकऱ्यांच्या वीज तोडणीचे नेमके उत्तर देण्याची मागणी केली.

त्यावेळी प्राजक्त तनपुरे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनची तोडणी करण्यात येत नाही. ज्यांनी चालू वीज बिले भरली आहेत. त्यांची वीज तोडली जात नसल्याचे स्पष्ट करत बाकी थकबाकी जे भरत नाहीत अशांची वीज तोडणी करण्यात येत असल्याचे सांगितले.

त्यावर फडणवीस यांनी तनपुरे यांना पुन्हा प्रश्न करत चालू बील म्हणजे नेमके काय १८ महिन्याचे चालू बील असते काय? असा सवाल करत चालू बिलात चालू गिरी करू नका असा इशाराही दिला.

त्यावर तनपुरे यांनी फडणवीस यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर आले नाही. त्यामुळे अखेर ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी फडणवीस यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, जे शेतकरी चालू बील भरून थकबाकी भरण्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना हप्ते पाडून दिले जातात. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जर चालू बिल भरले असेल तर त्यांची वीज जोडणी तोडण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले.

त्यावर पुन्हा फडणवीस यांनी राऊत यांना प्रश्न केला की, चालू बील म्हणजे नेमके कोणते बील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडणार नाही याची अंमलबजावणी करणार की नाही? तुम्ही दिलेल्या बिलात चालू बिलात थकबाकी आणि त्यावरील व्याजाचा बिलाच्या रकमेत समावेश करण्यात आला आहे.

त्यावर राऊत यांनी पुन्हा उत्तर देताना म्हणाले की, चालू बील म्हणजे तीन महिन्याचे बील हे बिल भरल्यानंतर थकबाकीची रक्कम भरण्यासाठी जे शेतकरी अर्ज करतात त्यांना हप्ते पाडून दिले जातात. आणि त्या हप्त्यानुसार शेतकऱ्यांनी रकमेची थकबाकी भरायची आहे.

त्यानंतरही फडणवीस यांनी अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करणार की नाही असा सवाल करत तुम्ही वकीलांसारखे आणि डॉक्‍़टर आहात म्हणून त्यापध्दतीने उत्तर देवू नका अशी सूचना करत तुम्ही मंत्री आहात त्यामुळे त्यानुसारच उत्तर द्या अशी मागणी केली. त्यावर नितीन राऊत यांनी त्यावर स्पेसिफीक उत्तर न देता ते सभागृहातून बाहेर पडले.

त्यानंतर विरोधकांनी याप्रश्नी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अध्यक्षांनी त्यागोंधळातच पुढील कामकाज पुकारले. परंतु तरीही विरोधकांनी गोंधळ घआलण्याचे थांबविले नाही. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उपमुख्यमंत्री आल्याशिवाय चालवू नका तो पर्यंत कामकाज तहकूब करा अशी मागणी करत सभात्याग केला. त्यानंतर तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज २५ मिनिटासाठी तहकूब केले.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे निर्देश, अनुसूचित जमातीची रिक्त पदे तात्काळ भरा

अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्ती विषयक लाभ देण्या बाबतचा त्याचप्रमाणे मानवतावादी दृष्टीकोनातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *