Breaking News

अखेर राज ठाकरेंच्याच “त्या” व्यंगचित्रातून शिवसेनेने दिले मनसेला प्रत्युत्तर सोयीनुसार आणि सुपारी नुसार पोकळ हिंदूत्व

राज्यात मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लक्ष्य करत अल्टीमेटम दिला. तसेच राज्यातील हिंदूत्वाच्या मुद्यावरूनही आक्रमक भूमिका स्विकारण्यास सुरुवात केली. तसेच नुकताच अयोध्या दौराही राज ठाकरे यांनी जाहीर केला. मात्र याच अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केलेली पुन्हा शिवसेनेने सव्याज परत करत त्यांचेच एक व्यंगचित्र प्रत्युत्तरा दाखल प्रसारीत कऱण्यात आले.
मागील गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी हिदूत्वाविषयीची आक्रमक भूमिका घेत मस्जिदीवरील भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतली. तर दुसऱ्याबाजूला हिंदूत्वाचे प्रतिकात्मक रूप म्हणून हनुमान चालिसास मुद्दा लावून धरला. याशिवाय ऐरवी भगवी शालही अंगावर धारण न करणारे राज ठाकरे यांनी पुणे येथील महाआरतीच्या दरम्यान अंगावर भगवी शालही पाघंरली. तर दुसऱ्याबाजूला त्यांच्याच पक्षाने त्यांना हिंदू जननायक ही पदवी बहाल केली.
आधीच राज्यात भाजपाकडून शिवसेनेने हिंदूत्व सोडले असल्याचा आरोप सुरु केल्याने भाजपाच्या या आरोपांना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सातत्याने उत्तर देण्यात येत आहे. मात्र आता राज ठाकरे यांच्याकडून अप्रत्यक्ष टीका सुरु करत आपण प्रखर हिंदूत्वाची दावाही अप्रत्यक्ष केल्याने शिवसेनेची अडचण झाली. त्यामुळे मागील वेळी उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून टीका करणाऱ्या राज ठाकरे यांना त्यांचेच व्यंगचित्र व्हायरल करत त्या टीकेची आठवण करून दिली होती.
ते व्यंगचित्र व्हायरल करताना शिवसेनेकडून सोयीनुसार आणि सुपारी नुसार पोकळ हिंदूत्व अशी खोचक टीका करण्यात आली आहे.
याशिवाय अशी वेळ कोणावरही येवू नये, उध्दव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आणि श्री राम मंदिराला विरोध करून व्यंग चित्र काढणारे राज ठाकरे ना शेवटी अयोध्येत जावे लागणार असल्याची बाबही शिवसेनेकडून जाणीवपूर्वक नमुद करण्यात आली आहे.

हेच ते व्यंगचित्र-

 

Check Also

मुख्यमंत्री पुत्राच्या त्या फोटोला प्रत्युत्तर देण्याच्या नादात शीतल म्हात्रे आल्या अडचणीत सुप्रिया सुळे यांचा मार्फिंग फोटो ट्विट केल्याने पोलिसात गुन्हा दाखल

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून काम करत …

Leave a Reply

Your email address will not be published.