Breaking News

दिवाळी नंतर ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार प्रकाश शेंडगे यांचा इशारा, मराठ्यांना मागासवर्गीय ठरविण्याचे षडयंत्र हाणून पडणार

राज्य सरकारने कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असे प्रमाणपत्र देण्यास सुरवात केली असतानाच आता राज्यातील ओबीसी समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसींमधून आरक्षण देण्यास ठाम विरोध केला आहे. यासंदर्भात दिवाळीनंतर ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार असून राज्यभर मेळावे घेऊन ओबीसी आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे. मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन मागासवर्गीय ठरवायच हे षडयंत्र हाणून पाडणार असल्याचा इशारा आज माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला.

पुढे बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले, मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यायला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असा महाराष्ट्र सरकारने शब्द दिला होता. निजामाच्या नोंदी शोधत आहोत. सुरुवातीला ५ हजार, ११ हजार नोंदी निघाल्या, आम्ही मान्य केले. आता शिंदे समितीला संपूर्ण महाराष्ट्रात नोंदी शोधण्याच काम लावले आहे. मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन मागासवर्गीय ठरविण्याचे हे षडयंत्र आम्ही हाणून पडू असा इशारा दिला.

प्रकाश शेंडगे म्हणाले की, “सुप्रीम कोर्टाने मराठा समाज मागास नाही हे दाखवून दिलय. आता कुणबी दाखले देऊन मागासवर्गीय होतो का?. जात बदलण्याचा अधिकार कोणाला नाहीय. आम्ही न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय सुद्धा केलाय. अशा प्रकारे कुठली समिती नेमून मागासवर्गीय ठरवू शकत नाही. एखाद्या समाजाला मागास ठरवण्याची प्रक्रिया असते. राज्य मागासवर्गीय आयोग आहे.

प्रकाश शेंडगे म्हणाले, यासंदर्भात दिवाळीनंतर १७ तारखेला अंबड येथे पहिला मेळावा तर , त्या २६ नोव्हेंबरला हिंगोलीला दुसरा मेळावा होईल. “आम्ही आमची संख्या दाखवून देऊ. ओबीसी रस्त्यावर येऊ शकत नाही असं समजू नये. मरणाची लढाई लढण्याची पाळी आली तरी चालेल. गरीब, ओबीसी समाजाचा आरक्षणचा संरक्षण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्ही मतपेटीतून आमची ताकद दाखवून देऊ. ओबीसी समाज शांत बसणार नाही. ओबीसी समाज ठामपणे भुजबळांच्या पाठिशी आहे असेही म्हणाले.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *