Breaking News

विद्यार्थ्यांना दिलासाः पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा यंदा नाही उच्च व तंत्रशिक्षण उदय सामंत यांची घोषणा

पुणे : प्रतिनिधी
राज्यातील विविध विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परिक्षा यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार नसल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.
कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर १० वी आणि १२ वी च्या परिक्षा घेता आले नाहीत. तसेच या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करून उत्तीर्ण करण्यात आले. यापार्श्वभूमीवर पदवी अभ्यासक्रमासाठी सीईटी परिक्षा घेणे कदाचीत उचित होणार नाही. त्यामुळे सीईटी परिक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता सध्या वर्तविण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यादृष्टीनेही ही परिक्षा यंदाच्यावर्षी घेण्यात येणार नसल्याचे त्यांनी जाहिर केले.
१२ वी परिक्षेच्या निकालानंतर मेडिकल आणि इंजिनिअरींग अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर सीईटी परिक्षा बंधनकारक आहे. या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यास इंजिनिअरींग आणि मेडिकलच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. मात्र यंदा ही परिक्षाच घेण्यात येणार नसल्याने आणि या अभ्यासक्रमासाठी थेट १२ वी परिक्षेत मिळालेल्या गुणाच्या आधारेच प्रवेश देण्यात येणार असल्याने या दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रवेशात गोंधळात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बारावीच्या निकालांच्या आधारावरच विद्यार्थ्यांचे पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश होणार आहेत.बारावी परीक्षेचा निकाल ९९ टक्के लागला असल्याने एवढ्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश कसे मिळणार ? अशी चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी CET परीक्षा घेतली जाण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अशी कोणतीही सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नसून, बारावीच्या निकालांच्या आधारावरच पदवी परीक्षेचे प्रवेश होणार असल्याचे त्यांनी जाहिर केले.

Check Also

शिंदे समर्थक आमदारांच्या त्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, फ्रेंडशिप डे… उध्दव ठाकरेंबरोबर मैत्री होणार का? यावर बोलणे टाळले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकाविले. …

Leave a Reply

Your email address will not be published.