Breaking News

कोरोनामुळे विद्यार्थ्यांची फि सरकारने भरावी, एकच फि राज्यभरात लागू करा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यावर छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे आंदोलन

मुंबईः प्रतिनिधी
छात्रभारती विद्यार्थी संघटनेने २७ जुलै रोजी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर केले होते. सदर निवेदनात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असे नमुद केलेले असतांना देखील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील महत्वाच्या शिक्षण विषयक मागण्यांकडे कानाडोळा केल्याच्या पार्श्वभूमीवर आज छात्रभारतीच्या विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या शासकिय निवासस्थानासमोर आंदोलन केले.
मोडुन पडलेल्या शिक्षण व्यवस्थेला संजीवनी मिळेल अशी अपेक्षा काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून होती. मात्र त्यांनी देखील शिक्षणाच्या प्रश्नांवर कुठलीही भरीव तरतूद केली नाही अथवा सामान्यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही हे पुरोगामी सेक्युलर विचारधारेच्या काँग्रेस पक्षाच्या महाविकासआघाडीतील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लक्षात घ्यायला हवे आणि तातडीने छात्रभारतीच्या मागण्या मान्य करून राज्यातील गरीब सामान्यांच्या मुलाबाळांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी काम करावे असे मत रोहित ढाले यांनी व्यक्त केले.
कोरोनाच्या कठीण काळात विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून रहावा यासाठी विद्यार्थी हिताच्या खालील मागण्यांचा सकारात्मक निर्णय व्हावा , ही विनंती. सकारात्मक निर्णय न झाल्यास छात्रभारती विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन करेल.
१. मुलींच्या मोफत शिक्षणाच्या दि. ६ मार्च १९८६ च्या परिपत्रकाची सर्व अनुदानित विनाअनुदानित व खाजगी संस्थामध्ये कठोर अंमलबजावणी करावी.
२. कोवीडमुळे नोकरी किंवा रोजगार गेल्याने शाळा / कॉलेजची फी भरली नाही अशा पालकांच्या मुलांची फी शासनाने तात्काळ भरावी.
३. १० वी व १२ वी च्या परीक्षेची फी भरायला पैसे नाहीत म्हणून फॉर्म न भरल्यामुळे नापास ठरवल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना पास करावे.
४. १२ वी पर्यंतचे सर्व शिक्षण सक्तीचे व मोफत करावे. विनाअनुदानित धोरण रद्द करावे, विनाअनुदानित धोरणाच्या नावखाली विद्यार्थी व पालकांची लूट थांबवावी.
५. राज्य भरात IT विषयाची फी शासनाने ठरवून द्यावी व ती राज्यभर एकच असावी.
६. राज्यातील अनुदानित विनाअनुदानित तसेच खाजगी शिक्षण संस्थांमधील अतिरिक्त बेकायदेशीर फी घेतली जाते राज्य शासनाने एक फी धारणा निश्चित करुन एकाच स्तरावरअंमलबजावणी करावी.
७. कोरोना काळात विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क तात्काळ परत करावे.
८. १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत बस पास द्यावे.
९. कोरोना काळात लाखो विद्यार्थ्यांनचे शिक्षण बंद झाले आहे , त्या विद्यार्थ्यांना तातडीने शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ठोस पाऊले उचलावी.
आंदोलनात छात्रभारतीचे कार्याध्यक्ष रोहित ढाले, संघटक सचिन बनसोडे, अनिकेत घुले, गणेश जोंधळे, मुंबईच्या अध्यक्ष दिपाली आंब्रे, जितेश किर्दगुडे, विकास पटेकर, सचिन काकड सह २५ कार्यकर्ते आंदोलनात सामील होते.

Check Also

महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल; विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन परिपत्रक हेरवाड ग्राम पंचायतीचा आदर्श समोर ठेवा

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाचे रूपांतर आता शासन निर्णयात झाले आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published.