Breaking News

सुप्रिया सुळे म्हणाल्या, चूक झाली तर तुरुंगात टाकणार तर तुमचीही चूक झालीय मग… अर्थविषयक विधेयकातील त्रुटीवरून लोकसभेत साधला निशाणा

लोकसभेत जीएसटी विधेयक आणि पीएमएलए कायद्यातील तरतूदींवरून लोकसभेत चर्चा सुरु होती. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना चांगलेच कोंडीत पकडल्याचे दृष्य पहायला मिळाले, भागवत कराड माझ्या राज्यातून येतात असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी जीएसटीबाबत काही त्रुटी असेल तर तुम्ही तातडीने त्या व्यक्तीला तुरुंगात टाकण्यावर आमचा आक्षेप आहे. तसेच तुमच्या अर्थविषयक विधेयकात पान क्रमांक ६ वर चूका असल्याची बाब निदर्शनास आणत आपण माणसे आहोत चूक माणसाकडून होते आपण देव थोडेच आहोत असे सांगत चांगलेच कोंडीत पकडले.

मला अर्थविषयक गोष्टींची तितकी माहिती नाही. त्यामुळे मला त्याबाबत भागवत कराड यांना विचारायचे आहे. आमच्या राज्यात एक वेगळीच गोष्ट सुरू केलीय. त्यांच्या विचारसरणीचं सरकार नसेल तर देशातील त्या राज्यात असे नेहमीच होतं. जर जीएसटीबाबत काहीही त्रुटी असतील तर तुम्ही तातडीने त्या व्यक्तिला तुरुंगात टाकणार. तुम्ही स्वतःच तुमच्या अर्थविषयक विधेयकात पान क्रमांक ६ वर चुका केल्यात असे उपरोधिकपणे त्यांनी केला. छोटीशी चूक झाली तर तुम्ही सरळ त्याला तुरुंगात टाकणार का? यावर मंत्रिमंडळात चर्चा झालीय? देशातील सर्व अर्थमंत्रालयांनी यावर सहमती दाखवलीय का? यावर कृपया स्पष्टता द्यावी. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही अर्थसंकल्पात चूक करु शकता. त्यामुळे एखादा व्यक्तीकडून चूक झाली तर त्याला वेळ द्या. आठवडा, ३ महिने किंवा ६ महिन्यात दुरुस्त करू द्या. तुम्ही तसं न करता तुरुंगात टाकणार का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आमच्या राज्यात तर आता स्टाईल झालीय. कोणालाही उचलतात आणि तुरुंगात टाकतात. पीएमएलएवर याच सरकारने टीका केली होती. आता याच सरकारने पीएमएलए अंतर्गत एफआयआरशिवाय कोणालाही तुरुंगात टाकता येईल असे म्हटले. असे कसे करता येईल हे मला कृपया सांगावे. अगदी सर्वोच्च न्यायालयाने देखील यावर टीका केलीय. प्रत्येकजण टीका करत आहे. कराडजी तुम्ही माझा काय गुन्हा आहे हे तर सांगा. काही विचारणार नाही आणि मला तुरुंगात टाकणार आणि मर्जी होईल तेव्हा एफआयआर करेल असे म्हणणार. ही लोकशाही आहे, असे थोडेच चालते. तुम्ही अशाप्रकारे लोकांना तुरुंगात टाकू शकत नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

नव्या संसदेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, लोकशाही व्यवस्था नाही तर…परंपरा ६० हजार कामगारांना रोजगार दिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण नुकतंच पार पडलं. पूर्वीपेक्षा मोठी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *