Breaking News

पोलिसांचा हवाला देत मुंबई महापालिकेने नाकारली शिंदे गट-ठाकरे गटाला परवानगी परवानगी दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल

नवरात्रोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे दसऱ्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी मुंबई महापालिकेला दिलेल्या अहवालाच्या आधारे मुंबई महापालिकेने शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी नकारघंटा कळविला आहे. तसे पत्रही शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांना आणि शिवसेनेच्या अनिल देसाई यांना पाठविले आहे.

उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सर्वात आधी दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठीचे पत्र मुंबई महापालिकेने दिले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटानेही आमचीच शिवसेना खरी असून आम्हालाच परवानगी मागणारे पत्र मुंबई महापालिकेला दिले. सुरुवातीला शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर भरवायचे असेल तर मैदान कसे भरायचे असा सवाल निर्माण झाला होता. त्यामुळे शिवाजी पार्कऐवजी बीकेसीच्या मैदानावर मेळावा घेण्याबाबतचा निर्णय शिंदे गटाकडून घेण्यात आला. तसेच दसऱ्याच्या एक-दोन दिवस मागे पुढे उध्दव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर मैदान द्यायचे असा निश्चय करण्यात आला होता.

परंतु मुंबई महापालिकेने या दोन्ही पत्रांच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांकडे याबाबत मते मागविले होते. त्यावर मुंबई पोलिसांनी त्यांच्या गुप्तचर यंत्रणांच्या आधारे आपला अभिप्राय देत अहवाल महापालिकेकडे सादर केला. त्या अहवालानुसार शिंदे गट किंवा ठाकरे गटापैकी एकास परवानगी दिल्यास मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. या अहवालाच्या आधारेच मुंबई महापालिकेने शिंदे गट आणि ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदान देता येणार नसल्याचे पत्र पाठवित स्पष्ट केले.

आता मुंबई महापालिकेने आज मैदान वापरास नकारघंटा कळविल्याने उध्दव ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर उध्दव ठाकरे गटाला मैदान देवू नये यासाठी शिंदे गटानेही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता दोन्ही गटापैकी कोणाला मैदान मिळणार याचा निर्णय उच्च न्यायालयात होणार आहे.

मुंबई महापालिकेने नकारघंटा दिलेले हेच ते पत्र:

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *