Breaking News

माथाडी कामगारांना लुटणारा कि साताराला अविकसित ठेवणारा ? साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत अटीतटीची लढत

साताराः प्रतिनिधी
देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सातारा जिल्ह्याचे आगळेवेगळे स्थान आहे. त्यातच साताऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज रहात असल्याने येथील स्थानिक राजकारणाबाबत राज्यातील जनतेला नेहमीच उत्सुकता लागू राहीली आहे. मात्र मागील अनेक वर्षापासून छत्रपतींचे वंशजांकडे लोकप्रतिनित्व असूनही जिल्ह्याचा विकास झालेला नाही तर याच भागातील माथाडी कामगारांच्या नावावर स्वतःचे घर भरणारे एक आमदार शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवित असल्याने सातारकरांची अवघड परिस्थिती बनली आहे.
मागील अनेक वर्षांपासून सातारा जिल्ह्याचे नेतृत्व छत्रपतींच्या वंशजाकडे आहे. मात्र गेल्या १० ते १५ वर्षात येथे ज्या प्रमाणात उद्योग, रस्ते, पाण्याचा प्रश्न ज्या गतीने सुटायला हवा होता. त्या प्रमाणात सुटला नाही. त्यातच जे उद्योग होते. ते उद्योग सातारा सोडून गेलेले आहेत. त्यामुळे या भागात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर युतीच्या काळात महसूल राज्यमंत्री असताना येथील अनेक जमिनींच्या कर्जासाठी, विकण्यासाठी अथवा जमिन भाडेपट्ट्यावर देण्यासाठी छत्रपतींच्या वंशजाकडच्या ना हरकत प्रमाणपत्राची तरतूद नियमात करून ठेवण्यात आल्याने त्यापोटी होणाऱ्या आर्थिक गैरव्यवराची दाद येथील स्थानिकांना कोठेही मागता येत नसल्याची कैफीयत या भागातील एका शेतकऱ्याने मांडली.

तर दुसऱ्याबाजूला शेती व्यवसाय सोडून रोजगारासाठी माथाडी कामगार बनलेल्या कामगारांची अवस्था फारशी चांगली नाही. आघाडी सरकारच्या काळात या माथाडी कामगारांना हक्काची घरे देण्याचा निर्णय घेतला. तसेच या कामगारांसाठी सिडकोकडून नवी मुंबईत आणि वडाळा येथे २४ घरे देण्यात आली. मात्र या घरांचा ताबा माथाडी कामगारांना देण्याऐवजी तो कामगारांच्या युनियनकडे देण्यात आला. या युनियनकडून घरे फुकट देण्याऐवजी स्वतःच्याच पतसंस्थेतून ४ कोटी रूपयांचे कामगारांना कर्ज घ्यायला भाग पाडून त्याच्याबळावर पतसंस्थेबरोबरच स्वतःचे भले करून घेतले. तसेच घराचे आमिष दाखवून १०४ माथाडी कामगारांची फसवणूक केल्याचे व्यथा एका माथाडी कामगाराने मांडली.
याच घोटाळ्याची चौकशी होवू नये यासाठी या सदर आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करत स्वतःचा बचाव करून घेण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे सातारकरांची अवस्था अत्ंयत अडचणीची झाली असून छत्रपतींच्या वंशजाला मत दिले तरी अडचण आणि स्वतःला माथाडी कामगारांचे नेते म्हणून घेणाऱ्याला दिले तर अडचणच असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींच्या विरोधातील तक्रारीबद्दल नड्डा यांना नोटीस

केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांना नोटीस बजावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *