Breaking News

Tag Archives: narendra patil

आतापर्यंत २३ हजाराहून अधिकांना २५ कोटी रुपयांपेक्षा व्याज परतावा लाभार्थ्यांना ७ दिवसांत व्याज परतावा देण्याचे नियोजन करावे-मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून आतापर्यंत २३ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा व्याज परतावा देण्यात आला आहे. यापुढील काळात लाभार्थ्यानी व्याज परताव्याचा दावा केल्यानंतर सात दिवसांच्या आत व्याज परताव्याचा लाभ देण्यासाठी महामंडळांनी कालबद्ध नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मराठा आरक्षण आणि …

Read More »

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी शासन सकारात्मक आहे. ९ सप्टेंबर २०२० ते ५ मे २०२१ दरम्यान सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (एसईबीसी) मधून आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (ईडब्ल्यूएस) विकल्प घेतलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत शासन सकारात्मक पाठपुरावा करेल, …

Read More »

सारथीच्या शैक्षणिक सवलती, सुविधांसंदर्भात लवकरच सर्वंकष समान धोरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. सारथीमार्फत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक सवलती आणि सुविधाबाबत सर्वंकष समान धोरण ठरविण्याबाबत बार्टी, टीआरटीआय, महाज्योती आणि सारथी या संस्थांची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील …

Read More »

एक लाख मराठा युवक उद्योजक तयार करण्याचे लक्ष्य अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे प्रतिपादन

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने राज्य सरकारच्या सहकार्याने १ लाख मराठा उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे , अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष आणि भाजपा नेते नरेंद्र पाटील यांनी दिली . भाजपा प्रदेश कार्यालयात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते. बुधवारी …

Read More »

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची मर्यादा वाढविली

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाखावरून १५ लाख करण्यात आल्याची माहिती या महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते. वैयक्तिक कर्ज परतावा योजनेंतर्गत वयोमर्यादेची …

Read More »

या ठिकाणीचे माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांना मिळणार ५० लाखाचे संरक्षण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर अत्यावश्यक घटकांमध्ये समावेश

मुंबई : प्रतिनिधी कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षारक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून करण्याचे व ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज …

Read More »

आम्ही बेरोजगार होतो, पण आता आम्ही देणारे आहोत अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजनेतून यशस्वी झालेल्या तरुणांकडून कोरोना संकटग्रस्तांना मदत

मुंबई : प्रतिनिधी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्यावसायिक कर्ज घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिलेले अनेक तरुण आता स्वयंपूर्ण झाले असून कोरोनाच्या संकटात ते आता इतरांना मदत करीत आहेत. काही काळापूर्वी बेरोजगार असलेल्या या तरुणांना महामंडळाने कर्जाच्या रुपाने मदतीचा हात दिला आणि त्यांना व्यवसाय करण्यास प्रेरीत केले. व्यवसायात यशस्वी …

Read More »

माथाडी कामगारांना लुटणारा कि साताराला अविकसित ठेवणारा ? साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत अटीतटीची लढत

साताराः प्रतिनिधी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सातारा जिल्ह्याचे आगळेवेगळे स्थान आहे. त्यातच साताऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज रहात असल्याने येथील स्थानिक राजकारणाबाबत राज्यातील जनतेला नेहमीच उत्सुकता लागू राहीली आहे. मात्र मागील अनेक वर्षापासून छत्रपतींचे वंशजांकडे लोकप्रतिनित्व असूनही जिल्ह्याचा विकास झालेला नाही तर याच भागातील माथाडी कामगारांच्या नावावर स्वतःचे घर …

Read More »