Breaking News

तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना मिळणार वाढीव दराने आर्थिक मदत राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मदतीचे पॅकेज जाहिर

मुंबई: प्रतिनिधी

 राज्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. केंद्रशासनाने विहित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने मदत देण्यात येणार असल्यामुळे वाढीव दरामुळे पडणारा आर्थिक भार राज्य शासनाच्या निधीमधून करण्यास मान्यता देण्यात आली.

ही मदत खालील प्रमाणे देण्यात येईल.

नैसर्गिक आपत्तीमध्ये  घरे पुर्णत: क्षतीग्रस्त झाले असल्यास किंवा अंशत: पडझड झालेल्या (किमान 15% नुकसान) कच्च्या व पक्क्या घरांपैकी ज्या घरांचे छत क्षतीग्रस्त झाल्याने अथवा पत्रे/कौले/छत उडुन गेल्याने घरातील कपडे व घरगुती भाडयांचे/वस्तुंचे  नुकसान झाले आहे अशा प्रकरणी कपडे तसेच  घरगुती भांडी / वस्तुंकरिता अर्थ सहाय्य प्रति कुटुंब रू. ५००० कपडयांच्या नुकसानीसाठी आणि प्रति कुटुंब रू.५००० घरगुती भांडी/वस्तु नुकसानीसाठी. पूर्णत: नष्ट झालेल्या  झालेल्या  पक्क्या व कच्च्या  घरांसाठी मदत रू. १,५०,००० प्रति घर आणि अंशत: पडझड झालेल्या (किमान १५ टक्के)  पक्क्या/कच्च्या घरांसाठी  मदत रू. १५,००० प्रति घर तसेच अंशत: पडझड झालेल्या (किमान २५ टक्के)  पक्क्या /कच्च्या घरांसाठी मदत रू.२५,००० प्रति घर आणि अंशत: पडझड झालेल्या (किमान ५० टक्के)  पक्क्या /कच्च्या घरांसाठी मदत रू.५०,००० प्रति घर. नष्ट झालेल्या झोपडीपैकी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी पात्र असलेल्या झोपडयांना मदत रू. १५,००० प्रति झोपडी अशी मदत देण्यात येईल.

 बहुवार्षिक पिकांच्या  नुकसानीसाठी मदत– बहुवार्षिक पिके- रू ५०,००० प्रति हेक्टर. नारळ झाडासाठी- रू २५० प्रति झाड, सुपारी झाडासाठी- रू ५० प्रति झाड, २ हेक्टरच्या मर्यादेत.

दुकानदार व टपरीधारक– जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव  स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्ड धारक आहेत त्यांना  पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रू.१०,००० पर्यंत आर्थिक मदत देण्यात यावी.

मत्सव्यवसायिकांचे नुकसान– बोटींची अंशत: दुरूस्ती रू १०,००० पूर्णत: नष्ट झालेल्या बोटींसाठी रू. २५,०००,अंशत: बाधित झालेल्या जाळयांच्या दुरूस्तीसाठी रू ५०००, पूर्णत: नष्ट झालेल्या जाळयांसाठी रू. ५०००.

आपत्ती प्रसंगी शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेखाली अनुदान/मदत घेतली असल्यास वरील  मदत अनुज्ञेय असणार नाही.

पूर्वी रोजगार हमी योजनेखाली जशी फळबाग योजना लागू होती त्याच धर्तीवर सचिव, जलसंधारण व रोजगार हमी योजना यांनी योजना कार्यान्वित करणेबाबत कार्यवाही करण्यात येईल. नुकसान झालेल्या कुक्कुटपालन शेडसाठी प्रत्यक्ष नुकसानीची रक्कम किंवा जास्तीत जास्त रू.५००० इतकी मदत देण्यात येईल. चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या कुटूंबांना २६-८-२०२० च्या शासन निर्णयान्वये मोफत अन्नधान्य व केरोसीन वाटप करण्यास मान्यता देण्यात आली. “तौक्ते” चक्रीवादळामुळे झालेल्या मृत्यूसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून ४ लक्ष रुपये इतक्या रक्कमेसोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अतिरिक्त १ लक्ष रुपये इतकी मदत देण्यात येईल.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *