Breaking News

मोहन भागवत यांचं मोठं विधान, हा हिंदूच देश, हिंदुंनीच मुस्लिमांचा सांभाळ केला छत्रपती शिवाजी महाजारांच्या जीवनाचे आपण अनुकरण करावे, मात्र ते घोड्यावर बसण्याइतपत सोपे नाहीये

आज विजयादशमी निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम नागपूर येथील संघाच्या मुख्य इमारतीमध्ये शस्त्र पूजनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी आरएसएस च्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं होत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्यावर सूचक भाष्य केलं होत.

देशात सर्व धर्म आणि पंथांचा आदर करणारा एक धर्म आहे, हा हिंदूंचा देश आहे, सर्वांची काळजी घेणार्‍यालाच हिंदू असं म्हणतात आणि हे फक्त हिंदुस्थानच करतो, असं मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष झाल्याच्या निमित्तानं आयोजित एका व्याख्यानात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं होतं. प्रतापनगर शिक्षण संस्थेनं हे व्याख्यान आयोजित केलं होतं.

आज सर्वत्र जगात सगळीकडे मारामारी होत आहे, तुम्ही वर्तमानपत्र वाचत असाल, युक्रेन युद्धाबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. हमास आणि इस्रायलमध्येही युद्ध होत आहे. मात्र, आपल्या देशात अशा मुद्द्यावर कधीही भांडण झालेलं नाही. आम्ही या मुद्द्यावर कधीही लढलो नाही, अशा मुद्द्यांवर आम्ही कोणाशीही भांडत नाही, याचं कारण आपण हिंदू आहोत, असंही मोहन भागवत यांनी म्हंटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच जीवनाचं आपण अनुकरण करावं असंच आहे. त्यांचं अनुकरण म्हणजे, घोड्यावर बसण्या एवढं सोपं नाही, त्यांनी ज्या गुणांचा आधारावर कर्तृत्व गाजवलं ते गुण कुठल्याही काळात महत्वाचे आहेत. त्यांना काय करायचं ते स्पष्ट होतं, काय करायचं हे माहीत होतं. हा त्यांचा गुण होता. लोकांचं दुःख त्यांना बघवलं गेलं नाही, लोकांची दयनीय अवस्था, महिला सुरक्षित नाहीत. महिलांची दुर्दशा पाहून शोक त्यांचा मनात होता, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

Check Also

पंतप्रधान मोदी यांच्या सातारा आणि सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जयराम रमेश यांचे प्रश्न

महाराष्ट्रातील पहिल्या दोन टप्प्यात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडल्यानंतर पुढील महिन्याच्या ७ मे रोजी तिसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *