Breaking News

झेंडूच्या फुलांचे बाजारभाव कोसळल्याने शेतकरी नाराज झेंडूच्या फुलांचे भाव वधरल्याने बळीराजा संकटात

दसरा सणानिमित्त यंदा झेंडूच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळेल. अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. पण मंचर आंबेगाव येथे सोमवारी प्रती किलो २५ ते तीस रुपये बाजारभाव शेतकऱ्यांना व ३५ ते ४० रुपये बाजारभावाने झेंडूची फुले ग्राहकांना मिळाली. फुलांचे बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला असून काही शेतकऱ्यांनी खर्च केलेले पैसे सुद्धा वसूल झालेले नाही अशी काहीशी परिस्थिती आहे.

झेंडूच्या फुलांसाठी आवश्यक असलेले वातावरण आंबेगाव तालुक्यात फुलशेतीसाठी पोषक हवामान व शेतजमीन आहे. शेवंती, झेंडू, गुलाब, आस्टरची फुलेशेती करणारे अनेक शेतकरी येथे आहेत. गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत मोठ्या प्रमाणात फुले पुणे व मुंबई बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवली जातात. तसेच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न होते.

‘गेल्या वर्षी ग्राहकांना ८० ते १०० रुपये किलो या बाजारभावाने झेंडूच्या फुलांची खरेदी करावी लागली होती. त्यावेळी शेतकर्याना सरासरी ७० रुपये बाजारभाव मिळाला होता. यावेळी फुलांना चांगला बाजारभाव मिळेल. या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडू फुलाचे पिक घेतले आहे. सोमवारी नारायणगाव, घोडेगाव, तांबडेमळा, अवसरी खुर्द, गावडेवाडी, लांडेवाडी आदी गावातून टेम्पोतून जवळपास २५ टन फुलांची आवक मंचरला झाली.

अनेक शेतकऱ्यांनी येथे फुलांची विक्री केली. दीपावलीपर्यंत असेच दर राहण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्च व बाजारात मिळणारा भाव पाहता फुलउत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार

कुक्कुटपालन सहकारी संस्थांच्या विविध अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील अशी माहिती महसूल,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *