Breaking News

रावणाची या गावात केली जाते पूजा; या मागचं कारण घेऊया जाणून ? महाराष्ट्रातील या गावात देवांप्रमाणे रावणाची केली जाते पूजा

दसरा सण अत्यंत हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी आपण रावणाचे दहन करून वाईट शक्तींचा पराभव करतो. परंतु अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात याचं रावणाची मनोभावे पूजा केली जाते. तसेच याठिकाणी रावणाला देवता समान पुजले जाते. ही प्रथा गेल्या अनेक काळापासून गावात चालत आलेली आहे. आज आपण याचं प्रथेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

हिंदू संस्कृतीत रावणाला एक दुष्ट , क्रूर व्यक्ती समजले जाते. परंतु सांगोळा गावात याच रावणाला देवता म्हणून पुजण्यात येते. या गावात ३५० वर्षांपुर्वीची रावणाची सुंदर आणि सुरेख मूर्ती आहे. तसेच, रावणासाठी सुंदर असे एक मंदिर देखील बांधण्यात आले आहे. या मंदिरात असलेल्या रावणाची गावकरी दररोज पूजा आर्चा करतात. तसेच, दसऱ्याच्या दिवशी रावणाला नैवेद्य दाखवतात. आपण जसे, इतर हिंदू देवतांना मानतो तसेच सांगोळा गावात रावणाला मानले जाते.

सांगोळा गावातील गावकऱ्यांची अशी मान्यता आहे की, रावण हा सर्वात मोठा शिवभक्त होता. त्याने कधीही देवी सीतेकडे वाईट नजरेने पाहिले नाही. तो लंकेचा एक शूरवीर राजा होता. तो एक हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती होता. त्यामुळे आपण रावणातील चांगुलपणाला पुजत राहिला हवा. यासाठी गावकरी दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन करू नका, असे आवाहन सर्वांना करतात. तसेच, तुम्ही रावणाला पुजले नाही तरी चालेल परंतू त्याची अशा पद्धतीने विटंबना करू नका, असे देखील सांगतात.

Check Also

अत्यावश्यक सेवेतील मतदारांसाठी टपाली मतदानाची सुविधा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. भारत निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *