Breaking News

‘बिग बॉस सुरु असताना या स्पर्धकाला करण्यात आली अटक बिग बॉस शो सुरु असताना वन विभागाच्या अधिकाऱ्याने या स्पर्धकाला केली अटक

बिग बॉस’ या शोची लोकप्रियता संपूर्ण देशभरात पसरली असून ‘बिग बॉस’ शोमुळे स्पर्धकांच्या करियरला एक वेगळी दिशा मिळते. ‘बिग बॉस’च्या लोकप्रियतेमुळे बिग बॉस फक्त हिंदीतच नाही तर मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड, बंगाली आणि मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये प्रसारित होतो. सध्या, हिंदी ‘बिग बॉस’चा १७ वा सीझन सुरु आहे.

हिंदी ‘बिग बॉस’सोबतच कन्नड आणि बिग बॉस तेलुगु देखील प्रसारित होत आहेत. पण आता कन्नड ‘बिग बॉस’मधून एक धक्कादायक गोष्ट समोर येत आहे. बिग बॉस कन्नड १० चा स्पर्धक वर्थुर संतोष याला अटक करण्यात आली आहे. रविवारी शो सुरु असताना वर्थुर याला अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे एकाच खळबळ उडाली आहे.

‘बिग बॉस’ शोमध्ये वाघाच्या पंजाचं पेंडेंट घातल्यामुळे वर्थुर संतोष याला अटक करण्यात आली आहे. वनविभागाकडून मिळालेल्या तक्ररीनंतर वर्थुर संतोष याच्यावर कारवाई करण्यात आली. बेंगळुरू शहराचे उप वनसंरक्षक एन रवींद्र कुमार यांनी वर्थुर संतोष याच्या अटकेवर स्पष्टीकरण दिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त वर्थुर संतोष याची चर्चा रंगली आहे.

बेंगळुरू शहराचे उप वनसंरक्षक एन रवींद्र कुमार म्हणाले, ‘संतोष याने वाघाच्या पंजाचं पेंडेंट घातलं होतं. म्हणून अधिकाऱ्यांनी शोमध्ये पाठवण्यात आलं आणि वर्थुर संतोष याला ताब्यात घेतलं आहे. तर यावर स्पष्टीकरण देताना वर्थुर संतोष याने आपली भूमिका मांडली आहे. ‘मला वाघाच्या पंजाचं पेंडेंट पूर्वजांकडून मिळाला आहे.’

 

Check Also

अंकिताचा बिगबॉस च्या घरात पतीवर आरोप; तू माझा वापर केलास”

‘बिग बॉस १७’ हिंदी च्या घरात दिवसेंदिवस सदस्यांमधील वाद वाढत चालले आहेत. मराठमोळ्या अंकिता लोखंडेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *