Breaking News

राज ठाकरे म्हणाले, पवारांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर धाडी ठाण्यातील मनसेच्या उत्तर सभेत टीका करांना दिले उत्तर

मनसेची पाडवा सभा झाल्यानंतर अनेकांनी माझ्या भूमिकेवर संशय व्यक्त करत त्यावर टीका केली. त्या सगळ्यांनी संपलेल्यांबद्दल बोलत नाही म्हणत सगळेच संपलेल्या पक्षाबद्दल बोलत राहीले. मनसे हा संपलेला पक्ष नाही तर दुसऱ्यांना विझविणारा पक्ष असल्याची टीका करत पवारांना ईडीची नोटीस येणार असल्याची कुणकुण लागताच काय नाटक केलं. अजित पवारांच्या बहिणीच्या घरावर धाडी पडल्या पण एकाच घरात राहणाऱ्या सुप्रिया सुळे यांना ईडीची साधी नोटीसही नाही असा खोचक सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.
तसेच जेव्हा जेव्हा शरद पवार हे नरेंद्र मोदींना भेटले त्या त्यानंतर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यावर धाडी पडल्या असल्याचा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी करत राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा भेटले त्यानंतर पहिली धाड अनिल देशमुखांच्या घरावर पडली. मग ते आत गेले. त्यानंतर पुन्हा भेट घेतली मग नवाब मलिक यांच्यावर धाड पडली. आता भेटले तर लगेच संजय राऊत यांच्यावर धाड पडली. बरं इतके होवूनही शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबध आजही सुमधूर असल्याचे ऐकिवात असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाडव्याच्या सभेनंतर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी ठाण्यात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
मी मागे त्यांच्यासोबत काही कार्यक्रम केले. त्यावेळी जे काही बोललो त्यामुळे ते खुष असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांच्या खुष होण्याचे मला त्यावेळी जरा शंकाच आली. मात्र त्यांच्या खुष होण्याचा अर्थ वेगळा असतो असा खुलासा करत सध्या ते संजय राऊत यांच्यावर खुष आहेत. पवारांनी केलेल्या गोष्टीची माहिती बऱ्याच उशीराने होते असे सांगत शरद पवारांच्या राजकिय खत्रुटपणाबद्दल इशारा दिला.
माझ्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, ईडीच्या नोटीशीनंतर एखाद्यामध्ये इतका बदल होईल असे वाटले नव्हते असे त्या म्हणाल्या. मी एका कंपनीत होतो. मात्र त्या कंपनीत मला योग्य वाटले नाही. म्हणून त्या कंपनीतून बाहेर पडलो. त्यानंतर मला ईडीची नोटीस आली. पण मी गेलो. चौकशीला सामोरे गेलो. त्यानंतर जंत (जयंत) पाटील म्हणाले की, संपलेल्या पक्षावर काही बोलत नाही म्हणून अरे या इथे संपलेला आहे की काय ते तुम्हाला असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. त्यानंतर अजित पवार म्हणाले की, इतकी वर्षे तुम्हाला भोंगे दिसले नाही का? दोन वर्षापूर्वी जो काही पहाटेचा शपथविधी झाला त्यानंतर अजित पवारांना एक मोठा झटका बसला. त्यानंतर त्यांच्या कानात फक्त गुई असा आवाज येत असावा त्यामुळे मी कोविड काळात जे काही बोललो ते ऐकायला आले नसावे म्हणत मी त्यांच्यासाठी तीन व्हिडिओ आणल्याचे सांगत मस्जिदीवरील भोंग्यावरून कधी कधी बोलणं झाले त्याचे व्हिडिओच राज ठाकरे यांनी दाखविले.
त्यानंतर जितेंद्र आव्हाडाने केलेल्या टीकेचा समाचार घेताना ते म्हणाले, लवकर उठून या तुम्हाला फिरवून दाखवतो आणि साधा वस्तरा जरी मिळाला तरी मी राजकारण संन्यास घेईन. उद्या तो आणखी काही तर बोलेलच असे सांगत ते म्हणाले अरे वस्तरा कसा सापडेल दाढी तर काढतच नाही. मग वस्तरा कसा सापडेल? असा सवाल करत मुंब्र्यात सापडलेल्या अतिरेक्याची यादी त्यांनी यावेळी वाचून दाखविली. तसेच डसेन वगैरे म्हणेल. तु येच तुझ्या शेपटाला पकडून गरगर फिरवून नाही फेकून दिला तर बघ असा दमही राज ठाकरे यांनी दिला.
छगन भुजबळांनी पण टीका केली. पण त्यांना आत जावे लागले ते त्यांच्या सीए आणि अन्य लोकांनी केलेल्या तक्रारीमुळे मोदी आणि शाह यांच्यामुळे त्यांना आत जावे लागले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *