राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात मस्जिदीवरील भोंग्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून हे सर्व भोंगे काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. मग या आदेशाची अंमलबजावणी राज्याच्या गृह विभागाने करायला नको का असा सवाल करत जसे आपण रस्ते घाण झाले की आपण स्वच्छ करतो मग कानाला त्रास व्हायला तर भोंगे काढायला नको का असा सवाल करत म्हणाले की, मला महाराष्ट्रात कोणत्याही दंगली नको आहेत. पण हे भोंगे 3 तारखेपर्यंत तुम्ही काढून टाका अन्यथा मला माझ्या भात्यातील दुसरा बाण काढायला भाग पाडू नका असा गर्भित इशाराही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला.
शरद पवार हे नास्तिक नेते आहेत. त्यांचा कधीही देवळात जावून हात जोडून पाया पडतानाचा फोटो तुम्हाला कधीच दिसणार नाही. सापडला तर तो एखादं दुसराच पण तोही नाही. ते खरे नास्तिक नेते आहेत. ते नेहमी फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे म्हणतात ते कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. का तर मुस्लिम मते हातची जातील या भीती पोटी ते कधी शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. पण हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे असे सांगत पवारांनी छत्रपतींचा इतिहास खोटा लिहिला म्हणून नेहमी आरोप करतात. मग काय खोटं लिहिले म्हणून विचारले की, ते पुरंदरेंचे नाव घेतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच ज्या काही बी ग्रेड सी ग्रेड जन्माला आल्या त्या केवळ जातीयतेमुळेच आल्याचा आरोपही त्यांनी केला.
शरद पवार हे नेहमी त्यांना अपेक्षित असलेले राजकारण समोरच्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते नेहमी आपली भूमिका बदलत ठेवत असल्याचा आरोप करत मला राजीव गांधी यांच्यानंतर मोदी हे पंतप्रधान पदासाठी योग्य व्यक्ती वाटले. मग त्यावेळी मी बोललो. त्यानंतर त्यांच्या काही भूमिका पटल्या नाहीत त्यामुळे मी त्यांच्यावर टीकाही केली. मग येथे भाजपाची स्क्रिप्ट कुठे आली असा सवालही त्यांनी यावेळी केला.
