Breaking News

राज ठाकरेंचे ट्विटरवरून आदेश, आरत्या करू नका पुढील आदेश उद्या देणार

पुणे येथील पत्रकार परिषदेत अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्व मंदिरांमध्ये महाआरती करणार असल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती. मात्र त्याच दिवशी रमजान ईद येत असल्याने या सणाला गालबोट लागू नये म्हणून अक्षय तृतीयेला सर्व मंदिरामध्ये होणाऱ्या आरत्या करू नका असे स्पष्ट आदेश राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून सर्व मनसैनिकांना आज दिले.

भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. त्यामुळे याबाबत आपण पुढे काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन असे सांगत उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या (औरंगाबाद) सभेत त्याबाबत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदात साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षय तृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका असेही त्यांनी आपल्या ट्विटमधून स्पष्ट केले.

दरम्यान, औरंगाबादेत कालच्या सभेच्या सभे दरम्यान राज ठाकरे यांनी भोंग्यावरून मुस्लिम समुदायाकडून रस्त्यावर करण्यात येत असलेल्या नमाज अदा करण्याच्या पध्दतीवर टीका केली. याशिवाय भाषण करताना धार्मिक तणाव निर्माण होईल अशा पध्दतीची काही वक्तव्य प्रक्षोभक पध्दतीने केल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली. त्यामुळे भोंग्याच्या विषय सामाजिक असल्याचे एकाबाजूला स्पष्ट करत दुसऱ्याबाजूला मात्र हनुमान चालिसा वाजविण्यासाठी मनसैनिकांऐवजी राज ठाकरे यांनी हिंदू धर्मियांना थेट साद घातल्याने अप्रत्यक्षरित्या प्रक्षोभक भाषण त्यांनी केल्याने राज ठाकरेंच्या भाषणाला धार्मिकतेची झालर होती अशीही चर्चा राजकिय वर्तुळात होत आहे.

त्याचबरोबर कोरोनातून सर्वसामान्य जनता आता कुठे सावरत असताना आणि गेलेल्या नोकऱ्यांना पर्याय शोधण्याचा प्रयत्न, महागाईचा वाढता आगडोंब यासह अनेक अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न होत असताना आता भोंग्यावरून पुन्हा एकप्रकारे जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु तर नाही ना असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

यापार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने रमजान ईदला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होवू नये या उद्देशानेच राज ठाकरे यांनी आरत्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *