Breaking News

शिंदे गटात जाण्याच्या चर्चेवर मिलिंद नार्वेकर यांनीच ट्विट करत दिली ‘ही’ माहिती मी भाग्यवान कारण मला गरूड वहनाच्या पुजेला सहभागी होता आलं

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सुरुवातीला उध्दव ठाकरे यांचे खास दूत म्हणून मिलिंद नार्वेकर हे सूरतला गेले होते. त्यानंतर शिवसेनेच्या अनेक सक्रिय घटनांपासून मिलिंद नार्वेकर हे लांब राहिले असल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. तसेच मातोश्रीवरही मिलिंद नार्वेकर दिसेनासे झालेले आहेत. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात येत असल्याचे वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर प्रसारमाध्यमातही या चर्चेला उधाण आले.

मात्र या साऱ्या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकर यांनीच ट्विट करत अप्रत्यक्ष या चर्चांना उत्तर दिले. आहे. ही चर्चा सुरू असताना मिलिंद नार्वेकर कुठे आहेत? असाही प्रश्न विचारला गेला. या चर्चांमध्ये आता स्वतः मिलिंद नार्वेकरांनी यांनी एक ट्वीट केलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये मिलिंद नार्वेकर म्हणाले, ‘मी भाग्यवान आहे की, मला सरन्यायाधीश उदय लळीत, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, तिरुमला तिरुपती देवस्थानचे प्रमुख सुब्बा रेड्डी यांच्यासमवेत श्री व्यंकटेश्वरा स्वामी मंदिरातील ब्रह्मोत्सवाच्या पाचव्या दिवशी गरुड वाहन पुजेचा साक्षीदार होता आलं.’

गुलाबराव पाटील बोलताना म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंदे गटात सहभागी होतील, गुलाबराव पाटलांनी ५० खोके घेतले मान्य आहे. पण चम्पासिंग थापाने काय केलं? ज्या थापाने त्याचं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केलं होतं, तोदेखील यांना सोडून आला. यांनी आता टीका करायची तरी कशी. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत, असा दावा केला.

गुलाबराव पाटील यांच्या दाव्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना विचारणा केली असता  त्यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं. मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल वारंवार विचारण्यात आलं असता त्यांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं म्हटलं. एक दिवस तरी राजकीय विषय सोडा, असंही ते मिश्कीलपणे प्रसारमाध्यमांना म्हणाले.

तर शिवसेना प्रवक्त्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मिलिंद नार्वेकरांसारखे नेते असं काही करतील यावर कुणाचाच विश्वास नाही. कारण राज ठाकरे, नारायण राणे प्रचंड आरोप केले होते. त्यातूनही ते तावून सलाखून निघाले. आज ते तिरुपती सारख्या आध्यात्मिक संस्थेवर आहेत. त्यांची सद्बुद्धी नेहमीच चांगली असते. मात्र, आता ते शिंदे गटात जाणार की नाही याविषयी मला काहीही माहिती नाही.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *