Breaking News

मल्लिकार्जून खर्गे यांचा हल्लाबोल, पंतप्रधान खोटे बोलतोय… विधानसभा निवडणूकीत म्हणतो अशोक गेहलोत जादूगार तर मी चमत्कार दाखविणारा

काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्यावतीने है तैयार हम या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या जाहिर सभेला ५ लाखाहून अधिक लोक उपस्थित होते. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते तथा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करत पंतप्रधान पदी असलेले नरेंद्र मोदी हे खोटारडा माणूस असल्याचा हल्लाबोल केला.

पुढे बोलताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणूकीच्या प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे जादूगार आहेत. तर मी चमत्कार घडविणारा असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यानंतर २०१४ सालच्या लोकसभा निवडणूकीतही देशातील प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा करणार, देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी वर्षाला २ कोटी नोकऱ्या उपलब्ध करून देणार अशा घोषणा केल्या. पण सर्व देशवासियांच्या खात्यात आले का १५ लाख रूपये, देशातील बेरोजगारी कमी झाली का असे खोटे बोलणारा व्यक्ती पंतप्रधान पदी बसल्याचा आरोपही केला.

त्याचबरोबर मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, भाजपावाले नेहमी देशाच्या सुरक्षेचा आणि लोकशाहीचा मुद्दा पुढे करतात. परंतु त्यांच्याकडून साधी संसदेची सुरक्षा करता आली नाही. वाढत्या बेरोजगारीमुळे देशातील दोन तरूण संसदेत घुसले आणि त्यांनी धूर पसरविला. या प्रश्नाचे उत्तर संसदेत देता आले नाही. एकाने प्रश्न विचारला म्हणून निलंबित केले. तर त्याच्या लोकशाहीच्या संरक्षण हक्कासाठी बाकीचे १४० खासदार पुढे आले तर त्यांनाही निलंबित केले. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री लोकशाहीनुसार संसदेत उत्तर न देता इकडे तिकडे जाऊन बोलतात मात्र संसदेत उत्तर देत नाहीत. हे कसली लोकशाही भाषा करतात असा सवालही यावेळी केला.

याशिवाय मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, २०२४ साली होणाऱ्या निवडणूकीत जर लोकशाही वाचविण्यासाठी आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी न केल्यास हे सगळंच बंद होईल. तसेच देशातील लोकशाही आणि सरकारी यंत्रणा आणि तुम्हा-आम्हाला मिळालेले स्वातंत्र्य टीकवायचे असेल तर भाजपाला पराभूत करणे गरजेचे आहे. त्यानंतर भाजपा कधीच दिसणार नाही. अन्यथा देशात पुन्हा कधीच निवडणूका होणार नसल्याचा इशाराही दिला.

मल्लिकार्जून खर्गे यांचे संपूर्ण भाषण मराठी भाषेतून
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी अर्धे भाषण हिंदी आणि मराठी भाषेतून केली. तसेच संपूर्ण भाषणही मराठी भाषेतून करत थेट उपस्थित मराठी समुदायाशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तर मजूर…

मल्लिकार्जून खर्गे यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवण रेड्डी यांच्या यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हCongressणाले, हे समोर जे काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी दिसत आहेत. ते तर मजूर आहेत. त्यांना जे सांगितले जाते तेच काम ते करतात. परंतु त्यांच्या मागे बसून जे सांगतात त्या कार्पोरेट कंपन्या आहेत. त्या कंपन्या कोण आहेत. त्यांना पहायला पाहिजे अशी टीकाही केली.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *