Breaking News

काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेच्या आक्रमकतेमुळे विधानसभा दिवसभरासाठी तहकूब मात्र गोंधळात विधेयके मंजूर करण्यासाठी सरकारसोबत हात मिळवणी

नागपूर : प्रतिनिधी

नाणार प्रकल्पाप्रश्नी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे केवळ नाईलाजास्तव शिवसेनेलाही आक्रमक भूमिका घ्यावी लागल्याने विधानसभेचे कामकाज तब्बल पाच वेळा तहकूब करत दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दरम्यान सरकारला विधेयके मंजूर करून घेण्यासाठी या तिन्ही राजकिय पक्षांनी सहकार्य केल्याने नाणार प्रश्नी रडीचा डाव असल्याचे फक्त करण्यात आल्याचे सभागृहात दिसून आले.

नाणार प्रश्नी बुधवारपासून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे श्रेयवादाच्या लढाईत आपण पराभूत होवू शकतो याची शक्यता गृहीत धरीत शिवसेनेनेही कालची भूमिका आजही कायम ठेवली. त्यामुळे या तिन्ही पक्षांच्या सर्वच आमदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा होत नाणार जाणार असल्याच्या घोषणा देण्यात येत होती. यामुळे सभागृहाचे कामकाज पाच वेळा तहकूब करत अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

दरम्यान, या गोंधळातच सहकार विभागाचे पुर्नस्थापना विधेयक, शिक्षण विभागाचे विद्यापीठ विधेयक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते महामार्ग विधेयक, वित्त विभागाचे विनियोजन विधेयक यासह पाच विधेयक राज्य सरकारने मंजूर घेतली. विशेष म्हणजे काँग्रेसने सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचे जाहीर करूनही या तिन्ही पक्षांनी विधेयके मंजूर करण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली. त्यामुळे नाणारच्या जनतेसमोर या तिन्ही पक्षांनी फक्त रडीचा डाव केल्याचे पाह्यला मिळाले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *