Breaking News

वीजेच्या धक्क्याने जखमी झालेल्यांना उपचाराचा खर्च देणार ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी

ग्रामीण भागात वीजेचा धक्का लागून जखमी होणे किंवा गतप्राण होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये जखमी झालेल्यांना सिव्हील सर्जनने प्रमाणित केले असेल तर अशा जखमींना त्यांच्यावरील उपचाराचा खर्च देण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

विधानसभेत सुरेश गोरे यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या कालावधीत याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.

याचबरोबर वीजेच्या धक्क्याने जे व्यक्ती मृत्यूमुखी पडतात, अशा व्यक्तींच्या कुटुंबियांना ४ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्यात येते. ही भरपाई देण्यात पूर्वी उशीर लागत होता. पण आता त्याची प्रक्रिया गती देणार आहे. तसेच वीजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागून शेतकऱ्यांची शेतपीके जळून खाक होण्याच्या घटनाही घडतात. त्याची भरपाईही लवकर देण्याबाबत पाऊले उचलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात सध्या वीजेची मागणी १४ हजार ५०० मेगावँट इतकी असल्याने वीजे निर्मितीचे अनेक संच बंद ठेवण्यात आल्याचा दावा मंत्री बावनकुळे यांनी केला. मात्र उन्हाळ्यामध्ये हाच आकडा मोठा असल्याचे सांगत राज्यातील अनेक भागात कमी दाबाने वीजेचापुरवठा होत असल्याचेही त्यांनी यावेळी मान्य केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *