Breaking News

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शरद पवार हे प्रतिष्ठीत नेते, आमचं सरकार लक्ष देईल मुख्यमंत्री प्रकरण हाताळत आहेत

काल एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक वर हल्ला करत आंदोलन केले. या हल्ल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड गुणरत्न सदावर्ते आणि १०९ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले. त्यात न्यायालयानेही सदावर्तेंना दोन दिवस पोलिस कोठडी तर १०९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या घटनेवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त करत, शरद पवार हे समजूदार नेते असून ते प्रतिष्ठीत नेते आहेत. या प्रकारची घटना कोणीही चांगली म्हणणार नसल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केली.

शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी असलेल्या सिल्व्हर ओकवर शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. राज्यभरात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करत गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध केला आहे. तर शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी केली. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तब्बर १०९ आंदोलकांना अटक केली असून त्यांची रवानगी आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी तर थेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रसारमाध्यांचे कॅमेरे तिथे पोहचतात तर पोलिस का नाही असा सवाल केला.

दरम्यान नाशिक दौऱ्यावर असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर विश्वास दाखवत “राज्याचे मुख्यमंत्री हे प्रकरण हाताळत आहेत. ते समजुतदार आहेत. खुद्द शरद पवार एक प्रतिष्ठित नेते आहेत. त्यामुळे या प्रकारची घटना कुणीही चांगली म्हणणार नाही. अशा प्रकारची घटना होऊ नये, असं मला वाटतं. त्यासाठी आमचं राज्य सरकार लक्ष देईल असे स्पष्ट केले.

तर कालच्या या घटनेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस काय करत होते असा सवाल उपस्थित करत कालच्या घटनेबाबत अनेक माहिती बाहेर येत आहे. या घटनेमागचा सूत्रधार कोण हे शोधून काढणार असा गर्भित इशारा दिला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *