Breaking News

सदावर्तेंना दोन दिवस पोलिस तर १०९ जणांना न्यायालयीन कोठडी जामीन अर्ज फेटाळला

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी त्या आंदोलनकर्त्या १०९ जणांबरोबर वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. त्यानंतर आज किल्ला कोर्टात या सर्वांना हजर करण्यात आले. त्यावेळी झालेल्या सुनावणीत गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी तर १०९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

यापैकी १०९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर लगेच त्यांचे वकील अॅड संदीप गायकवाड यांनी जामीनासाठी अर्ज केला. परंतु न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावत जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यास सांगितले.

किल्ला न्यायालयात न्यायाधीश कैलास सावंत यांच्यासमोर झालेल्या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील अॅड. प्रतिप घरत यांनी या आंदोलनकर्त्यांना अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनीच उचकाविले आहे. त्याचबरोबर त्या घटनेमागे आणखी कोणी आहे का? याचे आणखी कोणी सुत्रधार आहेत याचा तपास करायचा असल्याने सदावर्ते यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली.

त्यानंतर सदावर्ते यांचे वकील वासवानी यांनी सदावर्ते हे उच्च शिक्षित आहेत. त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. सदावर्ते यांनी कोणतेही लोकांना प्रक्षोभक वक्तव्य केले नाही. तसेच घटनास्थळीही ते उपस्थित नव्हते. तसेच प्रत्यक्ष घटना घडताना सदावर्ते हे मॅट न्यायालायत होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना जावून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली त्यावेळी त्यांना सदरची घटना कळल्याचा दावा केला.

तसेच त्यांच्या प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे सरकारने सादर करावेत असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. जर पोलिसांच्या आरोपात तथ्य नसेल तर न्यायालयाने सदावर्तेंना जामीन मंजूर करावा अशी मागणी केली.

त्यानंतर १०९ आंदोलन कर्त्यांनाच्या याचिकेवरही सुणावनी घेण्यात आली. त्यावेळी आंदोलनकर्त्यांचे वकील गायकवाड यांनी आंदोलकांची भूमिका समजून घ्यावी अशी विनंती न्यायालयास केली.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तर १०९ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

त्यानंतर न्यायालयाने सदावर्ते यांच्या शरीरावर कोणत्या खुणा किंवा जखमी झाल्या आहेत का? याची तपासणी केली. त्यानंतर सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेवून लोकमान्य टिळक पोलिस ठाण्यात नेले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

गिरिष महाजन यांचे आवाहन, ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ मध्ये सर्वांनी सहभागी व्हा

मुंबईतील पर्यटन स्थळे जागतिक नकाशावर पोहोचवण्यासाठी २० ते २८ जानेवारी दरम्यान मुंबई फेस्टिव्हल २०२४ चे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *