Breaking News

Tag Archives: st workers

जयंत पाटील म्हणाले, सिल्व्हर ओकवर हल्ला कुणी करायला लावला हे आता स्पष्ट

ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकवर हल्ला केला ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले गेले याचा अर्थ सिल्व्हर ओकवर जाण्यासाठी त्यांना कुणी फुस लावली होती हे लक्षात येते असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाचे हत्यार उपसण्यात आले होते. त्यावेळी १०५ एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार …

Read More »

गोपीचंद पडळकर यांचे परिवहन मंत्री परब यांना पत्र, तर उद्रेक होणार नाही… कोविड काळातील कामाचा एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप प्रोत्साहन भत्ता नाहीच

कोविडच्या पहिल्या लाटे दरम्यान संपूर्ण देश आणि देशातील कामकाज ठप्प होते. त्यावेळी राज्य सरकारच्या विविध कामकाजासाठी एसटी महामंडळातील विविध कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा देत त्यांच्याकडून विशेष सेवा बजावून घेण्यात आली. त्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांनीही विशेषतः ड्रायव्हरनी आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा बजावली. या सेवा बजाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्या सेवेबद्दल प्रोत्साहन …

Read More »

सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी जामीन मिळण्याची शक्यता

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवास्थानावर केलेल्या आंदोलन प्रकरणी अटक करण्यात आलेले, अॅड गुणरत्न सदावर्ते यांना आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सदावर्ते यांची आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. …

Read More »

अनिल परब म्हणाले की, “त्या” हल्लेखोर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई एसटी महामंडळाच्या बैठकीनंतर परब यांची माहिती

संप काळात ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात येणार आहे. मात्र जे कर्मचारी शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात सहभागी झाले होते, त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिली. एसटीच्या कायद्यामध्ये एखादा कर्मचारी गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असेल …

Read More »

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचे राज्य व देशभर पडसाद राष्ट्रवादीने केले काळयापट्टया बांधून मूक आंदोलन...

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्लाचा निषेध म्हणून आज राज्यभर आणि गोवा राज्यात काळयापट्टया बांधून राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी, युवक, युवती व महिला यांनी मूक आंदोलन केले. शुक्रवारी शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांच्या एका जमावाने भ्याड हल्ला केला त्यानंतर राज्यभर तणावाचे …

Read More »

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शरद पवार हे प्रतिष्ठीत नेते, आमचं सरकार लक्ष देईल मुख्यमंत्री प्रकरण हाताळत आहेत

काल एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक वर हल्ला करत आंदोलन केले. या हल्ल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड गुणरत्न सदावर्ते आणि १०९ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले. त्यात न्यायालयानेही सदावर्तेंना दोन दिवस पोलिस कोठडी तर १०९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या …

Read More »

फडणवीसांचा सवाल, माध्यमे पोहोचली मग पोलिस का उशीरा पोहोचले? तेव्हा पोलिस काय करत होते

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानावर हल्ला करत आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा निषेध करत कोणत्याही नेत्यांच्या घरावर जावून अशा पध्दतीचे आंदोलन करणे चुकीचे असल्याचे मतही ट्विट करत व्यक्त केले होते. मात्र आज …

Read More »

गोपीचंद पडळकर म्हणाले, तेव्हा जे ठरलं होतं त्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्यानंतर पडळकरांची प्रतिक्रिया

एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्याच्या प्रश्नावरून सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, तेव्हा दे ठरलं होतं त्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही असे सांगत तो आमचा निर्णय योग्य होता असेही मत व्यक्त केले. मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचारी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या …

Read More »

हल्ल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, कोण आहेत शोधा आणि कडक कारवाई करा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अतिशय निंदनीय

राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी पाऊले उचलत आहे. मुंबई उच्च न्यायालयाला शासनाने काय काय निर्णय घेतले आहेत त्याची व्यवस्थित माहिती दिली आहे. न्यायालय देखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून असून यासंदर्भातील निर्णय देखील त्यांनी दिला आहे, मात्र आज ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या या अचानक हल्ल्याची …

Read More »

घरावरील हल्ल्यानंतर शरद पवार म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पण… टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही

एसटी कर्मचाऱ्यांचे एकही अधिवेशन मी चुकविले नाही. जेव्हा जेव्हा त्यांचा प्रश्न समोर आला त्यासाठी पुढाकार घेतला. काही कर्मचाऱ्यांनी चुकीचे पाऊल उचलले. तरीही आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याची स्पष्टोक्ती शरद पवार यांनी देत पण त्यांच्या चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर …

Read More »