Breaking News

फडणवीसांचा सवाल, माध्यमे पोहोचली मग पोलिस का उशीरा पोहोचले? तेव्हा पोलिस काय करत होते

मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानावर हल्ला करत आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याचा निषेध करत कोणत्याही नेत्यांच्या घरावर जावून अशा पध्दतीचे आंदोलन करणे चुकीचे असल्याचे मतही ट्विट करत व्यक्त केले होते. मात्र आज फडणवीस यांनी पवारांच्या घरावर आंदोलनकर्त्ये जात असताना पोलिस काय करत होते? असा सवाल केला.

तसेच गुप्तचर विभागाची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

उत्तर कोल्हापूर पोट निवडणूकीच्या प्रचारार्थ ते कोल्हापूरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

माझी प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आले होते, तेव्हा त्यांनी मला सांगितले की, दुपारी २.३० वाजताच आम्हाला असे मेसेज मिळाले होते. मग प्रसारमाध्यमांना असे मेसेज मिळत होते. तर मग पोलिस काय करत होते असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर लोक प्लॅनिंग करून जातात, तेव्हा पोलीस काय करत होते. एवढ्या मोठ्या आंदोलनाची पोलिसांना कल्पना नसणे, हे पोलिसांचं अपयश आहे. पोलिसांच्या आणि गुप्तचर यंत्रणांच्या या अपयशाची चौकशी व्हायला हवी, माध्यमांचे कॅमेरामॅन त्याठिकाणी पोहोचले पण पोलीस उशीरा पोहोचले, याचं कारण काय? असा सवाल सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलनानंतर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनाचं दृश्य आपण सगळ्यांनी पाहिलं, ते दृश्य अतिशय भयावह होतं. त्यामुळे याची चौकशी झालीच पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात बोलताना म्हणाले. तसेच काल घडलेल्या घटनेचे मास्टरमाईंड नागपुरात बसलेले आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला होता. त्यावर बोलताना आपण अशा लोकांच्या आरोपांना उत्तर देत नाहीत असे सांगत मिटकरींच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

याप्रकरणी १०७ आंदोलकांवर गावदेवी पोलीस ठाण्यात दंगल माजवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी २३ महिला आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमागे कोण आहे, त्याचा तपास केला जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या परिसरात आंदोलक कसे घुसले, गुप्तचर विभागाला त्याची काही माहिती मिळाली नाही का, याचाही तपास केला जाईल. तशा सूचना पोलीस आयुक्तांना दिल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

नाना पटोले यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *