Breaking News

आधी लाठीचार्ज नंतर आंदोलनकर्त्यांशी मखलाशीः जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक चर्चेसाठी येताच पाठ जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांनी बोलण्यास सुरुवात करताच आंदोलनकर्त्ये उठून गेले

मागील तीन-चार दिवसांपासून राजापूर येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प उभारणीला स्थानिकांकडून सातत्याने विरोध करण्यात येत आहे. तसेच या प्रकल्पासाठी जमिन परिक्षणाच्या कामासही स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवित रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शविला. मात्र राज्य सरकारकडून स्थानिकांचा विरोध डावलून सातत्याने जमीन परिक्षणाचे काम तसेच सुरु ठेवले. त्यामुळे प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. आज पुन्हा आंदोलनकर्त्यांनी प्रकल्प स्थळावर एकत्र जमत विरोध करण्यास सुरुवात केली असता भर उन्हात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांनाकडून आंदोलन कर्त्यांना मागे रेटण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यानंतर पुन्हा अचानक प्रशासनाला राज्य सरकारने दाखविलेल्या चर्चेची आठवण होत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक चर्चेसाठी आंदोलनस्थळी आले मात्र आंदोलनकर्त्यांनी या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठ फिरविल्याचे चित्र पाह्यला मिळाले.

नाणार येथील रिफायनरी प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बारसू येथील जागा देण्याची तयारी दर्शवित तसे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले. मात्र राज्यात सत्तांतर झाले आणि नव्या शिंदे-फडणवीस सरकारने बारसू येथे रिफायनरी प्रकल्प आणण्याची तयारी सुरु केली. तसेच रिफायनरीच्या व्यवस्थापनाकडून प्रस्तावित जमिनीचे माती परिक्षणाचे काम सुरु केले. मात्र आता या प्रकल्पास स्थानिक नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे. तसेच माती परिक्षणाचे काम थांबविण्यासाठी ठिय्या आंदोलनही सुरु केले. यावरून राजकिय वातावरण चांगलेच तापल्याने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेत सल्लामसलत केली. त्यावर शरद पवार यांनीही चर्चेतून मार्ग काढण्याची सूचना करत आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक घ्या अशी सूचना केली. परंतु त्यानंतर दोन दिवस उलटून गेले तरी राज्य सरकारचे प्रतिनिधी हे आंदोलनकर्त्यांशी चर्चेसाठी पाचारण केले नाही. त्यामुळे हे आंदोलन सतत सुरुच ठेवले.

विशेष म्हणजे आज शुक्रवारी दुपारी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करत असल्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांकडून तीन दिवसांसाठी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली. अखेर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक आंदोलनस्थळी येत नागरिकांशी चर्चेची तयारी दर्शविली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी बोलण्यास सुरुवात करताच सर्व आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कोणतेही एक ऐकले नाही आणि उठून निघून गेले.

त्यावर आधी आम्हाला मारझोड करायची अन नंतर मखलाशी करायची हे जमणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेस नकार दिला.
दरम्यान, आंदोलनस्थळी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत हे गेले असता पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *