Breaking News

अखेर कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणत भाजपाचा सत्यजीत तांबेंना पाठिंबा जाहिर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून तांबे पिता-पुत्राकडून केलेल्या राजकिय नाट्यामुळे काँग्रेस विरूध्द भाजपा असा सामना सुरु झाला. त्यातच या संपूर्ण खेळामागे भाजपाच असल्याची चर्चाही सुरु झाली. मात्र भाजपाकडून जाणीवपूर्वक सत्यजीत तांबे यांना जाहिर पाठिंबा केला जात नव्हता. अखेर आज सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून भाजपाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपा नेते तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

विशेष म्हणजे या निवडणूकीसाठी उद्या सोमवारी ३० जानेवारी रोजी मतदान होत आहे. मात्र आजच भाजपाच्या श्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार अहमदनगर आणि नाशिकमधील भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला सत्यजीत तांबे यांचा फोटो स्टेटसला ठेवत तांबे यांना भाजपाने पाठिंबा दिल्याचे अप्रत्यक्ष जाहिर केले. मात्र अधिकृत्या जाहिर केले नव्हते. अखेर दुपारी जाहिर केले.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील जागेसाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेसने नागपूर आणि नाशिकमधील जागेची अदलाबदल करत नाशिकची जागा शिवसेनेला दिली. त्यामुळे शिवसेनेने या निवडणूकीत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. त्यास महाविकास आघाडीने पाठिंबा दिला.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपा पक्षाने अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला आहे. याबाबतची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर हा निर्णय झाल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर झालेला आहे. सत्यजित तांबे तरुण आहेत. होतकरू आहेत. त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणूनच आमच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात करण्यात आली असल्याची माहितीही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे या जागेवर कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचीच फुस असल्याचे सांगण्यात येत असून सत्यजीत तांबे यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्त्ये आणि यंत्रणा राबत असल्याची चर्चाही अहमदनगर आणि मतदारसंघात सुरु आहे.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *