Breaking News

धनंजय मुंडेच्या आरोपा आधीच पंकजा मुंडेची पोलिसांकडे तक्रार पंकजा मुंडे यांच्या पीएने ५० लाखांची लाच मागितल्याची धनंजयचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायक्काने (पीए) एका कामासाठी तब्बल ५० लाख रूपयांची लाच मागितल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरूवारी विधान परिषदेत केला. पंकजा मुंडे यांनीही याच सत्रात या कट कारस्थानाची चौकशी करण्यासाठी आपल्या स्वीय सहाय्यकांनी पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती देत या आरोपातील हवा काढली.

एका वृत्तवाहिनीने बुधवारी धनंजय मुंडे यांनी एक लक्षवेधी सूचना मांडण्याच्या प्रकरणात लाच घेतल्याचा आरोप असलेली बातमी दाखवली होती. त्याच बातमीत विधानमंडळाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. त्यालर बोलताना मुंडे यांनी आपल्यावर वैयक्तिक आरोप करण्यासाठी वृत्तवाहिनीला हाताशी धरून असे कट रचले जात असल्याचा आरोप केला. सरकारकडून आता सुरूवात झाली आहे. आता आपण याचा शेवट करणार. रोज एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची क्लिप आपण सादर करणार, असे ते म्हणाले. आज होळी आहे. आजच सुरू होऊ द्या, असे म्हणत मुंडे यांनी एक सीडी सभागृहात सादर केली. यात ग्रामविकास मंत्र्यांच्या पीएकडून एका कामासाठी ५० लाख रूपये मागितले जात असल्याचा पुरावा  असल्याचा आरोप केला..

कामकाजाच्या अखेरच्या टप्प्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सादर केलेल्या सीडीबद्दल आपले मत व्यक्त केले. ही सीडी आपले पीए प्रदीप कुलकर्णी यांना गुंतवण्यासाठी तयार करण्यात आली असून कुलकर्णी यांनी त्याविरूद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची आठवड्याभरात सखोल चौकशी करावी, अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांनाही केली आहे. ही सीडी कोणी केली व विरोधी पक्षनेत्यांना कोठून मिळाली हे त्यांनी जाहीर करावे. त्यामुळे अधिक सखोल चौकशी करणे शक्य होईल, असेही त्या म्हणाल्या. त्यावर धनंजय मुंडे यांनी, या सीडीचा स्त्रोत आपल्याला माहित आहे. आपणच त्याचा शोध घ्यावा. नाहीतर नेहमीप्रमाणे क्लिन चीट देऊन मोकळे व्हावे, असे म्हटले.

 

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *