Breaking News

अखेर अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम मार्गी लागणार लार्सन टुब्रोकडे कामाचे कंत्राट दिल्याची महसूल मंत्री पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

अखेर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे राहण्याच्या कामास लवकरच गती मिळणार असून स्मारक उभारणीच्या कामातील पहिल्या टप्प्यातील कंत्राटदाराच्या नेमणूकीची  प्रक्रिया पार पडली. या प्रकल्पाचे काम लार्सन अँड टुब्रो कंपनीला देण्यात आले आले असून तीन वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे.

सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाबाबत गुरूवारी विधान परिषदेत निवेदन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक अरबी समुद्रात राजभवनापासून १.२ किलोमीटर, गिरगाव चौपाटीपासून ३.६ किलोमीटर, नरीमन पॉईंटपासून २.६ किलोमीटर अंतरावर आहे. प्रकल्पामध्ये ६.८ हेक्टर बेटावर शिवाजी महाराजांचा २१० मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी विविध विभागाची १२ ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्यात आली आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीन निविदा प्राप्त झाल्या. त्यात लार्सन अँड टुब्रो कंपनी पात्र ठरली आणि त्यांना हे काम देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी २५०० कोटी अधिक वस्तू आणि सेवा कर असा खर्च प्रस्तावित आहे, असे पाटील यांनी सांगितले.

 

 

Check Also

नाना पटोले यांची टीका, नरेंद्र मोदीच खरा भटकता आत्मा, १० वर्ष केवळ जगभर भटंकती…

काँग्रेसच्या जाहिरनाम्यात धर्माचा उल्लेख कुठेही केलेला नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काँग्रेसबद्दल अपप्रचार करत आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *