Breaking News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार पोलिस स्टेशन चांगले बांधतात पण गृह खाते…

आज पहिल्यांदाच राज्य सरकारच्यावतीने बारामतीत आयोजित नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या होम टर्फवर पहिल्यांदाच एकत्र आले. त्यामुळे या नमो रोजगार मेळाव्यात एकमेकांच्या विरोधात उभे टाकलेले काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार, त्यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांच्याकडून काय बोलले जाते. परंतु भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही उपस्थित होते.

या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या कामाचे कौतुक करत विकास साधण्याची किमया असल्याचे जाहिरपणे सांगत तुम्ही येथील पोलिस स्टेशनच्या इमारती चांगल्या बांधल्या आहात. त्यामुळे भविष्यात राज्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या इमारती तुच्याकडूनच बांधून घेणार आहे. परंतु तुम्ही चांगले काम केले म्हणून गृह खाते तुम्हाला देईन असे मात्र समजू नका अशी कोपरखळी लगावत ते माझ्याच कडे ठेवणार असल्याचा सांगितले.

तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांच्या हातात विकास कामे करण्याची किमया आहे. त्यामुळे बारामतीत त्यांनी उभारलेल्या पोलिस सब हेडक्वार्टर आणि एसटी बसस्थानक अतिशय चांगल्या पध्दतीने उभारण्यात आले आहे. त्यामुळे पीसीएमसीच्या प्रमुख पदाची जबाबदारी तुमच्याकडे सोपविणार असून त्या माध्यमातून राज्यातील सर्व पोलिस स्थानकांचे बांधकाम करून घेणार असल्याचेही सांगितले.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, बारामतीत आयोजित केलेला हा नमो रोजगार मेळावा हा अजित पवार यांच्या पुढाकारानेच आयोजित करण्यात आला आहे. जवळपास ५२ हजार पदे अधिसूचित करण्यात आली आहेत. त्यामुळे पदांची संख्या जास्त आहे. मात्र त्यासाठी आलेले अर्ज कमी असून त्याची संख्या ३५ हजार इतकी आहे. परंतु हरकत नाही उद्याही आणखी अर्ज येणार असल्याने ५२ हजार पदांसाठी लागणारे मनुष्यबळ उद्या भरून निघेल असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

शेवटी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणतीही संस्था किंवा शासकिय कार्यालय चालवायचे असेल तर त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ लागते. त्यामुळेच कौशल्य विकास विभागाच्या मार्फत प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे याकरिता नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. नुकतेच जर्मनी आणि फ्रान्स या देशांना लागणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळासाठी राज्य सरकारशी करार केल्याचेही सांगितले.

दरम्यान, या संपूर्ण कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांकडे पाहण्याचे टाळले. तसेच अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही एकमेकांसमोर येणार नाही यादृष्टीने खबरदारी घेतली. परंतु एका वेळी ते समोरासमोर आलेच. मात्र त्यावेळी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांकडे पाहायचे टाळले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *