Breaking News

रोज सकाळी असत्याशी ‘सामना’! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना प्रवक्ते संजय राऊतांना टोला

मुंबई: प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर लिहिताना किंवा बोलताना एखादी व्यक्ती इतकी उथळपणा कसा करू शकते, तेही न्यायालयात झालेल्या सुनावणीचे ‘प्रोसेडिंग’ न वाचता आणि न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा एक भक्कम स्तंभ असताना असे सांगत रोज सकाळी असत्याशी ‘सामना’! दुर्लक्षितपणा की, ठरवून केलेली बदनामी? असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचे नाव न घेता ट्विटरद्वारे लगावत आता समजून घ्या हा विषय असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

  1. दिल्ली आणि इतरही राज्यांकडून ऑक्सिजनच्या संदर्भात अवास्तव आणि अतार्किक मागण्या होत होत्या. यंत्रणा जेव्हा आणखी तपशीलात गेली तेव्हा संपूर्ण भारतातून होत असलेल्या मागणीतील उणिवा लक्षात आल्या आणि त्यातून अनेक गैरप्रकारही पुढे आले.
  2. भारताचे सॉलिसिटर जनरल हे भारत सरकारचे प्रतिनिधीत्त्व करीत असतात.
  3. या आदेशातील पाने चाळून पाहिली, तरी सहज लक्षात येते की, केंद्र सरकारने स्वत:च सॉलिसिटर जनरल यांच्यामार्फत, तज्ञांचा समावेश असलेल्या व्यक्तींचा राष्ट्रीय टास्कफोर्स गठीत करण्याची सूचना केली. यातून ऑक्सिजन तरतूद आणि वितरणाची पद्धत निश्चित व्हावी, असे सांगितले गेले.
  4. याशिवाय, त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले की, ऑक्सिजनचा मुबलक साठा उपलब्ध आहे आणि ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी टँकर आयात करण्याची प्रक्रिया सुद्धा सातत्याने केली जात आहे. वरिष्ठ पातळीवर सर्व ती देखरेख ठेवली जात आहे.

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुणावनी दरम्यान झालेल्या गोष्टीचा खुलासा फडणवीस यांनी करत असे असताना वारंवार खोटारडेपणा का? असा सवालही शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना केला.

 

 

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *